नवी दिल्ली, 19 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीत हत्येची थरारक घटना समोर आली आहे. येथील एका घरमालकाने भाडेकरूवर धारदार चाकूने सपासप वार (Attack with knife) करत हत्या (house owner killed tenant) केली आहे. हत्येची थरारक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपी घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीनं भाडेकरूच्या पत्नीला देखील मारहाण केल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
काले खान असं हत्या झालेल्या भाडेकरूचं नाव आहे. मृत काले खान हा आपली पत्नी आणि तीन मुलांसमवेत आरोपी मुर्गन याच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. मृत काले खान हे गुरुवारी रात्री घरासमोर शेकोटी करून शेकत बसले होते. यावेळी याठिकाणी आरोपी घरमालक मुर्गन आला. त्याने भाडेकरूकडे विजबिलाच्या पैशांची मागणी केली. विजबिलाच्या पैशावरून दोघांमध्ये वाद (dispute over electricity bill) झाला.
हेही वाचा-भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल, क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा
दोघांमधील वाद विकोपाला जावून आरोपीनं भाडेकरू काले खान याला मारहाण केली. एवढंच नव्हे तर आरोपीनं भाडेकरूच्या पत्नीला देखील कानशिलात लगावली. यावेळी भाडेकरूच्या पत्नीनेही आरोपीला कानशिलात लगावली. या वादानंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला. पण थोड्या वेळाने तो आपल्या मित्राला आणि मुलाला घेऊन घटनास्थळी परत आला. विजबिलाच्या पैशावरून पुन्हा भाडेकरू आणि घरमालकात वाद झाला.
हेही वाचा-कुंड्या चोरल्याने दिली तालिबानी शिक्षा; महिला पोलिसानं मायलेकाची काढली धिंड
यावेळी संताप अनावर झाल्याने आरोपी घरमालकाने भाडेकरू काले खाने यांच्यावर धारदार चाकुने सपासप वार केले. तसेच भाडेकरूच्या पत्नीच्या डोक्यात देखील जड वस्तूने प्रहार केला. दोघा जखमी दाम्पत्याला जखमी अवस्थेत पाहून स्थानिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काले खान यांना मृत घोषित केलं आहे. तर त्यांच्या पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Delhi, Murder