जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल, क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल, क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल,  क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

Crime in Beed: क्रिप्टो कॉईनची (Crypto Coin) भुरळ बीडमधील एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. क्रिप्टो कॉइन देण्याचं आमिष दाखवून (lure of giving crypto coin) बंगळुरू येथील भामट्याने लाखोंचा गंडा घातला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 19 डिसेंबर: गेल्या काही काळापासून तरुणांमध्ये शेअर मार्केट आणि क्रिप्टो कॉईनबाबतची (Crypto coin) क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. झटपट पैसै कमवण्यासाठी अनेकजण शेअर मार्केट आणि क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक करत आहेत. पण मार्केटबाबत योग्य ते ज्ञान नसल्याने अशा तरुणांची फसवणूक होण्याचं प्रमाणदेखील वाढलं आहे. क्रिप्टो कॉईनची भुरळ बीडमधील एका तरुणाला चांगलीच महागात पडली आहे. क्रिप्टो कॉइन देण्याचं आमिष दाखवून (lure of giving crypto coin) बंगळुरू येथील भामट्याने तब्बल 3 लाखांचा गंडा (fraud 3 lakh)घातला आहे. याप्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रोहिदास शिवचंद चौधरी असं फसवणूक झालेल्या 27 वर्षीय तरुणाचं नाव असून तो बीड शहरातील शिवाजी नगर परिसरात वास्तव्याला आहे. फिर्यादी तरुणाने काही दिवसांपूर्वी ‘बायनान्स’च्या माध्यमातून क्रिप्टो कॉईनमध्ये गुंतवणूक केली होती. बायनान्सवर ट्रेडिंग करत असताना, त्याची ओळख बंगळुरू येथील संजू नावाच्या एका युवकासोबत झाली होती. दोघांमध्ये एक दोन वेळी क्रिप्टो कॉईनचे व्यवहार झाले होते. यामुळे रोहिदासचा आरोपीवर विश्वास बसला होता. हेही वाचा- औरंगाबाद: बडा घर अन् पोकळ वासा; 20 लाखांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा अमानुष छळ यातूनच 5 नोव्हेंबर रोजी रोहिदास याने क्रिप्टो कॉईन खरेदी करण्यासाठी संजूला ‘गूगल पे’ वरून तीन लाख रुपये पाठवले होते. पण संजूने मात्र क्रिप्टो कॉईन देण्यास टाळाटळ सुरू केली. अनेकदा संवाद साधूनही तो विविध कारणं देऊन क्रिप्टो कॉईन देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर आरोपी संजू याने डिंसेबर महिन्यात आपला फोन बंद करून ठेवला आणि फिर्यादीशी पूर्णपणे संवाद बंद केला. हेही वाचा- चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, रोहिदास याने बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजू नावाच्या अनोळखी व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ठोंबरे करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात