मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कुंड्या चोरल्याने दिली तालिबानी शिक्षा; महिला पोलिसानं मायलेकाची काढली धिंड, साताऱ्यातील संतापजनक घटना

कुंड्या चोरल्याने दिली तालिबानी शिक्षा; महिला पोलिसानं मायलेकाची काढली धिंड, साताऱ्यातील संतापजनक घटना

Crime in Satara: सातारा जिल्ह्यातील फलटण याठिकाणी एका महिला पोलिसानं दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला तालिबानी शिक्षा दिली आहे.

Crime in Satara: सातारा जिल्ह्यातील फलटण याठिकाणी एका महिला पोलिसानं दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला तालिबानी शिक्षा दिली आहे.

Crime in Satara: सातारा जिल्ह्यातील फलटण याठिकाणी एका महिला पोलिसानं दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला तालिबानी शिक्षा दिली आहे.

सातारा, 19 डिसेंबर: सातारा जिल्ह्यातील फलटण याठिकाणी एका महिला पोलिसानं दोन अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आईला तालिबानी शिक्षा दिली आहे. फुलांच्या कुंड्या चोरल्याच्या (theft flower pot) कारणातून आरोपी महिला पोलिसानं दोन अल्पवयीन मुलांना आणि त्यांच्या आईला काठीने बेदम मारहाण (minor boys and their mother Beat) केली आहे. एवढंच नव्हे तर चोरी केलेल्या कुंड्या डोक्यावर घ्यायला लावून मायलेकांची धिंड काढली आहे. याप्रकरणी आरोपी महिला पोलिसाविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सविता आगम असं गुन्हा दाखल झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. आरोपी महिला फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहरातील दत्तनगर येथील रहिवासी असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनी आरोपी महिलेच्या घराच्या अंगणातील काही फुलांच्या कुंड्या चोरून आणल्या होत्या. चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर, आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित मुलांच्या घरी जाऊन त्यांना आणि त्यांच्या आईला काठीने व्रण उठेपर्यंत मारहाण केली आहे.

हेही वाचा-औरंगाबाद: बडा घर अन् पोकळ वासा; 20 लाखांसाठी डॉक्टर पतीकडून विवाहितेचा अमानुष छळ

एवढेच नव्हे तर, त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर चोरी केलेल्या कुंड्या ठेवून त्यांची धिंड काढली आहे. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गावातील सजग नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे तक्रार केली. तसेच कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.

हेही वाचा-भामट्याने बीडच्या तरुणाला केलं कंगाल, क्रिप्टो कॉइनचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा

परिस्थितीचं गांभीर्य आणि नागरिकांती रोष लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी बरडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याशी चर्चा करुन महिला पोलीस आगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी सविता आगम यांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Satara