मराठी बातम्या /बातम्या /देश /

राज्यात शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या समीकरणाची चर्चा; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

राज्यात शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस अशा नव्या समीकरणाची चर्चा; संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया

Sanjay Raut reaction:  महाराष्ट्र राज्यात  (Maharashtra State) सध्या शिवसेना, (Shiv sena)भाजप, (BJP) एनसीपी (NCP)अशा नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 18 जुलै: महाराष्ट्र राज्यात (Maharashtra State) सध्या शिवसेना, (Shiv sena)भाजप, (BJP) एनसीपी (NCP)अशा नव्या समीकरणाची चर्चा सुरु आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार  5 वर्ष चालेल असं राऊतांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

यावर बोलताना राऊत म्हणाले की, अशी स्वप्न पडणं हा आजार आहे. असे काही होणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष चालेल.

शरद पवारांचा सरकारला आशीर्वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्याआशीर्वादाने सरकार चालतं असं विधान केलं. त्यावर विधानावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे वयाने, अनुभवाने मोठे आहेत. त्यांचा आशीर्वाद सरकारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हे मान्य केलंय. अमोल  कोल्हे यांचा टोन राणा भीमदेव थाटात बोलले असतील, तीन पक्षांशिवाय सरकारचे बॅनर नाही, असं राऊतांनी सांगितलं आहे.

''राज ठाकरे हा आश्वासक चेहरा, पण...'', चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य

मनसे- भाजप युतीवर राऊतांच्या प्रतिक्रिया

आज सकाळी नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे मनसे- भाजपची युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं. यावरही संजय राऊत म्हणाले की, अशी समीकरणे राजकारणात होत असतात. पण महापालिकेवरील शिवसेनेचा झेंडा खाली उतरणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्यापासून लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक झाली. देशातील महागाई, कोव्हिड, पेट्रोल दरवाढ, लडाखमध्ये चीनची घुसखोरी आदी विषयांवर पावसाळी अधिवेशनात चर्चा व्हावी अशी मागणी विरोधी पक्ष करणार आहे. या बैठकीत ओबीसी, मराठा आरक्षणाचा मुद्दा पंतप्रधानांसमोर उपस्थित करून त्यांना ठोस निर्णय घ्यायला सांगू, असंही संजय राऊत म्हणालेत.

First published:

Tags: BJP, NCP, Sanjay raut, Shiv sena