मराठी बातम्या /बातम्या /nashik /

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, मनसेसोबतच्या युतीवर केलं भाष्य

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान, मनसेसोबतच्या युतीवर केलं भाष्य

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

'...म्हणून माजी मंत्री म्हणू नका म्हणालो', 48 तासांची मुदत संपताच चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Chandrakant Patil Meet Raj Thakceray: आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नाशिकच्या (Nashik) विश्रामगृहाच्या बाहेर भेट झाली.

नाशिक, 18 जुलै: आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakceray) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची नाशिकच्या (Nashik) विश्रामगृहाच्या बाहेर भेट झाली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांना आश्वासक चेहरा म्हटलं आहे. राज ठाकरे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली असून युतीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) कशावरही बोलू शकतात, असंही पाटील म्हणाले आहेत.

राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. जर त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर नक्कीच स्वागत करु आणि तरच आम्ही सोबत येऊ शकतो असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मनसे सोबत युती ही चर्चा असून निर्णय मात्र पक्ष मंथन करून घेतो, असं म्हणत त्यांनी भाजप मनसे युतीच्या चर्चांवर स्पष्टिकरण दिलं आहे. माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो असं राज ठाकरे मला बोलल्याचंही पाटलांनी सांगितलं आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे कशावरही बोलू शकतात, असं ते म्हणालेत.

अनिल देशमुखांच्या मूळगावी EDचे छापे, कार्यकर्त्यांच्या नारेबाजीचा Live Video

सध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. आम्ही मुसलमान विरोधी नाही. मात्र त्यांचं लांगुलचालन करत नाही. रयत, जानकर,आरपीआय सोबत आहेतच, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

कोविडमुळं अनेक अडचणी, समस्यांना,लोकांना तोंड द्यावं लागलं

मदतीसाठी,भाजपनं अग्रेसिव्ह पुढाकार घेतला

कोविड सेंटर्ससह व्हॅक्सीनेशन पर्यंत सर्व बाबतीत आघाडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्यानं व्हर्च्युअल संवाद साधला

कोरोना कमी झालाय गेला नाही

काळजी घेऊन संघटनात्मक दौरा राज्यात सुरु

राज्यातील,पालिका निवडणुकांसाठी भाजप तयार

नाशकात,भाजपनं जाहीर केलेल्या, जाहिरनाम्याची पूर्तता करतेय

नुकतीच सिटीलिंक बस सुरू झाली

19 जुलै पासून सुरू होणाऱ्या सांसद पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेट

दुसरं कोणतंही कारण नाही

First published:

Tags: Chandrakant patil, Nashik, Raj Thackeray