नवी दिल्ली, 29 मार्च : महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. काही जणांनी ठाकरेंची साथ सोडत, शिंदेंना साथ दिली. ठाकरेंचे आमदार शिंदे गटात गेले आहेत. दरम्यान आता ठाकरेंचे दोन खासदारही त्यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी रायझिंग इंडिया या नेटवर्क 18 च्या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केला आहे. केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील दोन खासदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगलं सरकार आहे. ठाकरेंनी त्याच्या सरकारच्या काळात प्रलंबित ठेवलेले प्रकल्प आताचं सरकार मार्गी लावत आहे. शिवसेना आमच्यासोबत आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची साथ सोडली, यासाठी आम्ही जबाबदार नाहीत” Rising India : जलाशय कचरामुक्त ठेवण्यासाठी तरुणाचा लढा! News18 कडून रिअल हिरोचा सन्मान “काही मोजके खासदार सोडले तर त्यांचे सर्व खासदार आमच्यासोबत. आणखी दोन आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही मला मिळाली आहे. विधिमंडळात तर हम दो हमारे दोन असेच राहतील. फक्त आडनाव वापरून चालत नाही, आता घराणेशाही चालणार नाही. मेरिटनुसारच देश प्रगती करेल”, असं ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंसह राहुल गांधींनाही त्यांनी लक्ष्य केलं आहे. तसंच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी नंबर वन हिरो आहेत, असं म्हणत त्यांनी मोदींचंही कौतुक केलं आहे. मोदींच्या नेतृत्वात आपण 2047 पर्यंत विकासाचा मोठा टप्पा गाठू, अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. रायझिंग इंडिया समिट 2023 न्यूज 18 नेटवर्क आणि पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड (सायरस पूनावाला ग्रुप) ने ‘रायझिंग इंडिया समिट 2023’ या दोन दिवसीय कॉन्क्लेव्हचं आयोजन केलं. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेसमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा विषय आहे ‘द हीरोज ऑफ रायझिंग इंडिया’. ज्याचा उद्देश सर्वसामान्य भारतीयांच्या असामान्य कामगिरीवर प्रकाश टाकणं हा आहे. यादरम्यान अशा वीरांचा गौरव करण्यात आला ज्यांनी आपल्या अनोख्या उपायांनी तळागाळात सुधारणा करून लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला. संमेलनाचा पहिला दिवस शानदार होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परिवहन, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.