नवी दिल्ली : शिक्षण, कला, राजकारण, समाजकारण या क्षेत्रात विविध काम करणारे आणि आपलं महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकांचा News 18 नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी त्यांनी पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडही अशा तरुणांची, युवकांची आणि समाजाला एक वेगळी दिशा देणाऱ्यांची पाठ थोपटण्यासाठी पुढे आले आहेत.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगातील विविध भागांतील प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला 'द हिरोज ऑफ रायझिंग इंडिया' असे नाव देण्यात आले आहे. या मेगा-इव्हेंटमध्ये सामान्य लोकांच्या असामान्य योगदानाचा गौरव केला जाईल. अशा केवळ 20 वीरांचा सन्मान केला जाईल.
हरियाणातील कैथल गावातील शेतकरी बिरेंद्र यादव. 2020 च्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वीरेंद्र यादव यांचा उल्लेख केला होता. कृषी-ऊर्जा वनस्पती आणि पेपर मिल्सना तण विकून त्याने फायदा मिळवला. शेतात तण जाळून त्यापासून होणारं प्रदूषण टाळण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं होतं.
यासाठी शेतकऱ्याने कृषी विभागाच्या मदतीने स्ट्रॉ बेलर मशीन खरेदी केले. त्यांनी पेंढा आणि तण एकत्र बांधून वेगवेगळ्या ठिकाणी विकले. अवघ्या 2 वर्षात अडीच कोटींहून अधिक किमतीचे तण विकले असल्याचा वीरेंद्रचा दावा आहे. आणि त्यामुळे तो एक प्रेरणास्थान बनला आहे. खरं तर, उत्तर भारतातील शेतकरी दरवर्षी हिवाळ्यात तण जाळतात. त्यामुळे वायू प्रदूषण होते. त्या तणाचा अशा प्रकारे वापर करून वीरेंद्रने समाजासमोर खरोखरच एक ज्वलंत उदाहरण घालून दिले आहे.
जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील रहिवासी बिलाल अहमद दार यांचा समावेश आहे. या तरुणाच्या कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवर कौतुक करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचं कौतुक केलं होतं. उला तलावातून एका वर्षात 12,000 किलोपेक्षा जास्त कचरा साफ केल्याबद्दल मोदींनी 18 वर्षीय तरुणाचे मन की बातमध्ये कौतुक केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.