Home /News /maharashtra /

लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले... जान है तो जहान है

लॉकडाऊन आणखी वाढणार! लवकरच निर्णय, महापौर म्हणाले... जान है तो जहान है

देशासह राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू आहे. त्यात नाशिक शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

    नाशिक, 19 जून: देशासह राज्यात कोरोना विषाणूचा उद्रेक सुरू आहे. त्यात नाशिक शहरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहर आणखी 10 दिवस लॉकडाऊन करावं, अशी मागणी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. हेही वाचा...हर्षवर्धन जाधव यांचा नवा VIDEO, रावसाहेब दानवेंसह चंद्रकांत खैरेंवर केले सणसणीत आरोप महापौर म्हणाले, शहरातील परिस्थिती गंभीर आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काही होऊ शकत नाही. आम्ही लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतो, पण शासनाशी विचार विनिमय झाल्यास योग्य होईल. जान है तो जहान है. नागरिक वाचलेच नाहीत तर अर्थकारणाला काय करणार, असा सवाल महपौर यांनी उपस्थित केला आहे. नियम पाळावे हे नाशिककरांना आवाहन त्यांनी केलं आहे. शहर लॉकडाऊन करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही महापौर सतीश कुलकर्णा यांनी सांगितलं आहे. दरम्यान, फिजिकल डिस्टन्सिंगसह सभ्यतेचा फज्जा उडाल्यानं नाशिक महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. महासभेत अक्षरश: हमरीतुमरी झाली. सत्ताधारी भाजपबरोबर सेना व राष्ट्रवादीची भूमिका संशयास्पद असल्याचं दिसून आलं. या गोंधळांत मात्र, 16 कोटींचे वादग्रस्त विषय मंजूर करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ‘झूम’ ॲपद्वारे ऑनलाइन महासभा घेण्यात आली. मात्र, नेटवर्कमधील अडचणी तसेच महापौरांचा आवाज येत नसल्याचे निमित्त करून हमरीतुमरीपर्यंत उतरत राडा घातल्यानंतर पुढे शिवसेना व राष्ट्रवादीच्या सौम्य विरोधाच्या जोरावर सत्ताधारी भाजपने तीन वर्षांपूर्वीचे जुने 16 कोटी रुपयांचे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित पाणीपुरवठ्याचे विषय मंजूर करून टाकले. तत्पूर्वी सत्ताधारी भाजपवर राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार यांनी टक्केवारीसाठी कशा पद्धतीने महासभा साजरी केली जात आहे. हेही वाचा...खूशखबर! कोरोनोवर नवी उपचार पद्धत सापडली, एम्सच्या डॉक्टरांचा दावा भाजप गटनेते जगदीश पाटील यांना बाहेरच बघून घेतो, अशी दमबाजी केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच फिजिकल डिस्टन्सिंगसह सभ्यतेचाही फज्जा उडाला होता.
    First published:

    Tags: Corona, Corona virus, Coronavirus update, Nashik news

    पुढील बातम्या