नवी दिल्ली, 17 जून : महाराष्ट्रापाठोपाठ राजधानी दिल्लीत Coronvirus चं थैमान आता सुरू झालं आहे. गेल्या 15 दिवसात अतिशय वेगाने Covid-19 चे रुग्ण वाढत आहेत. दिल्लीचा मृत्यूदरही वाढत असल्याने काळजी वाढत आहे. त्यातच आणखी चिंता वाढवणारी बातमी आली आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची Corona test पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त आहे. दिल्लीच्या आरोग्य खात्यानेच याविषयी बातमी दिली आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना दोन दिवस लक्षणं जाणवत होती. ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना राजीव गांधी सुपर स्पेशलियटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सुरुवातीला चाचणी निगेटिव्ह आली पण रुग्णालयात केलेली दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
Delhi Health Minister Satyendar Jain tests positive for #COVID19: Office of Delhi Health Minister pic.twitter.com/d27YmJpGpH
— ANI (@ANI) June 17, 2020
भारतातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 80 टक्के मृत्यू फक्त पाच राज्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्राबरोबर दिल्लीचा समावेश आहे. बापरे! भारतातल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 100 देशांपेक्षाही जास्त महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत. त्याचप्रमाणे भारतात असे 65 जिल्हे आहेत ज्यात मृत्यूचे प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, गुजरातचे 11, उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 10 आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हा प्रभावित झाले आहेत. सध्या भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गुजरातमध्ये सर्वाधिक आहे. गुजरात राज्याचा कोरोना मृत्यू दर 6. 3 टक्के आहे. देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 9915 लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत. संकलन - अरुंधती अन्य बातम्या कोरोना चाचणीसाठी थेट लॅबमध्ये येणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय कोरोना चाचणीसाठी थेट लॅबमध्ये येणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय