बापरे! भारतातल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 100 देशांपेक्षाही जास्त

बापरे! भारतातल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 100 देशांपेक्षाही जास्त

देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 17 जून:  अनलॉक नंतर भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज काही हजार रुग्णांची देशात भर पडत आहेत. आत्तापर्यंत 3.55 लाख रुग्ण देशात झाले आहेत. तर 12 हजार रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे देशातला कोरोना रुग्णांचा मृत्यूदर वाढला असून हा तर जगातल्या 100 देशांपेक्षा जास्त झाला आहे. शेजारच्या बांगलादेशपेक्षाही हा दर जास्त असून धोका वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सुमारे दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत सरकारने 1 जूनपासून अनलॉक म्हणजे । कडाऊन सुलभ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु देशात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी 45 टक्के मृत्यूही या 15 दिवसांत घडले आहेत. भारतात आतापर्यंत कोरोनामुळे 12 हजार लोकांनी प्राण गमावले आहेत, त्यामध्ये अनलॉक केल्यावर 4507 मृत्यू झाले आहेत.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे 8 जूननंतर मृत्यूचे प्रमाण संसर्ग दरापेक्षा जास्त वाढले आहे. संसर्गाचे प्रमाण 1.29 टक्के वाढले आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.33 टक्क्यांनी वाढले आहे. भारतातील कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपैकी जवळजवळ 80 टक्के मृत्यू पाच राज्यांमध्ये नोंदविण्यात आले आहेत.

हे वाचा -  देशात चायनीज फूडवर घाला बंदी; भारत-चीन तणावानंतर केंद्रीय मंत्र्यांनी केली मागणी

ही राज्ये महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात आहेत. त्याचप्रमाणे भारतात असे 65 जिल्हे आहेत ज्यात मृत्यूचे प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक आहे. यापैकी मध्य प्रदेशातील 19 जिल्हे, गुजरातचे 11, उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 10 आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जिल्हा प्रभावित झाले आहेत. सध्या भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण गुजरातमध्ये सर्वाधिक आहे. गुजरात राज्याचा कोरोना मृत्यू दर 6. 3 टक्के आहे.

हे वाचा -  मुंबईपासून जवळच होता 'त्या' भूकंपाचा केंद्रबिंदू

भारतातील सर्वाधिक मृत्यू झालेल्या 10 जिल्ह्यांमध्ये गुजरातमधील 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरातमधील सर्वाधिक मृत्यूदर पंचमहाल येथे 11.11  इतका आहे. त्याखालोखाल आनंद (9.45), पाटण (8.55), अरावली (8.11) आणि भावनगर (7.96)) आहे. राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा मानल्या जाणार्‍या अहमदाबादमध्येही मृत्यूचे प्रमाण 7.12 आहे.

First published: June 17, 2020, 7:29 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading