कोरोना चाचणीसाठी थेट लॅबमध्ये येणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

कोरोना चाचणीसाठी थेट लॅबमध्ये येणाऱ्यांबाबत राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले.

  • Share this:

मुंबई, 17 जून: खासगी प्रयोगशाळेत (लॅब) करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने 2200 व 2800 रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र, थेट लॅबमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून नागरिकांबाबत राज्य सरकारनं दिलासादायक निर्णय घेतला आहे.  थेट लॅबमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून 2800 रुपये न आकारता त्यांच्याकडून 2500 रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात 650 रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा... मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट!

आरोग्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच कोरोना चाचण्यांचे दर निश्चित केले. रुग्णालयातून रुग्णाचा स्वॅब घेतला त्यासाठी 2200 रुपये दर आणि रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेऊन तपासणी केली तर त्यााठी 2500 रुपये आकारायचे असा निर्णय झाला. मात्र काही व्यक्ती, रुग्ण स्वत: थेट प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करतात त्यांच्याकडून 2800 रुपये आकारले जातात. वास्तविक रुग्ण स्वत:हून आल्यावर प्रयोगशाळेला पीपीई कीटचा तसेच वाहतुकीचा खर्च येत नाही, अशा वेळी त्यांच्याकडून 2800 रुपयांऐवजी 2500 रुपये आकारावेत, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 2200 आणि 2800 यामधला टप्पा म्हणून 2500 रुपये राज्य शासनाने ठरवून दिले आहे.

मुंबईकरांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णवाहिकांची उपलब्धतात असेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या 500 रुग्णवाहिका उपलब्ध असून 50 रुग्णवाहिका महिंद्रा समुहाकडून मिळाल्या आहेत तर आठवडाभरात 150 रुग्णवाहिका उपलब्ध होतील त्यामुळे मुंबईत 650 रुग्णवाहिकांची सेवा मिळणार आहे. नागरिकांनी वॉर्डमधील वॉर रुमशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी नोंदवावी, ही सेवा नागरिकांना विनामुल्य मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत आयसीयुचे 500 बेडस् उपलब्ध होणार आहेत. त्यात आठवडाभरत अजून 100 ते 150 बेडस्ची भर पडणार आहे. सेंट जॉर्जेस, बीकेसी, सेव्हन हिल, वरळी डोम, येथे बेडस् वाढवण्यात येत आहेत. कांदीवलीतील राज्य कामगार विमा रुग्णालयात 250 बेडस् वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा...बापरे! भारतातल्या कोरोना रुग्णांचा मृत्यू दर 100 देशांपेक्षाही जास्त

रुग्णांना लक्षणे नाहीत त्यांच्या ऐवजी जे गंभीर आजारी आहेत, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयात प्राधान्याने दाखल करून घेण्याविषयी सांगण्यात येत आहे. यासाठी 80 टक्के खाटा घेतलेल्या रुग्णालयांमध्ये एक अधिकारी नेमला जाईल तिथे मदतीसाठी कक्ष उभारला जाईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांना थेट दाखल न करता गरजूंना दाखल करण्याविषयी हे अधिकारी समन्वय करतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

First published: June 17, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या