केजरीवाल यांनी विरोधकांना केलं क्लीन बोल्ड; आम आदमी पक्षाच्या विजयाची ही होती पंचसूत्री

केजरीवाल यांनी विरोधकांना केलं क्लीन बोल्ड; आम आदमी पक्षाच्या विजयाची ही होती पंचसूत्री

नवी दिल्लीमध्ये 'आप'ने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासाठी आपने नियोजनबद्ध आखणी केली होती. आपच्या विजयाची ही आहेत 5 प्रमुख कारणं

  • Share this:

प्रशांत लिला रामदास

दिल्ली, 11 फेब्रुवारी - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा विजय झाला आहे. मात्र यावेळी आम आदमी पार्टी काही जागा गमावताना दिसली. आम आदमी पार्टी आता दिल्लीत बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.

आम आदमी पार्टीच्या विजयाची पंचसूत्री -

1. मोदीना लक्ष्य नाही - आम आदमी पक्षाने निवडणूक प्रचारात प्रचंड दक्षता घेतली. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपने पंतप्रधान मोदींना एकदाही लक्ष्य केलं नाही. पक्षाच्या संपूर्ण वरिष्ठ नेत्यांनी पाच वर्षांच्या कामांवर मतं मागितली. आम आदमी पक्षानेही पारंपारिक भाजपा मतदारांची पूर्ण काळजी घेतली. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपा समर्थकांकडून मतं मागितली. आम आदमी पक्षाने हे समजून घेण्यात कोणतीही चूक केली नाही. त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला केला तर त्याचा फटका त्यांना सहन करावा लागेल असा आपचा अंदाज होता.

2. वीज, शिक्षण, पाणी हे मुद्दे केंद्रस्थानी - आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी वीज, शिक्षण, पाणी हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवले.

दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You - अरविंद केजरीवाल

संपूर्ण पक्षाने केलेली कामं जनतेपर्यंत नेली. संपूर्ण मोहिमेदरम्यान केजरीवाल यांनी जेव्हा लोकांशी संवाद साधला तेव्हा जनतेने केजरीवाल यांच्या मोफत वीज आणि पाण्याच्या प्रश्नावर लोकांचं लक्ष वेधलं. तथापि, भाजपाने जनतेत मोफत सुविधांविषयी नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये ते पूर्णपणे अयशस्वी झाले.

3. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा - आपचा मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित होतं. अरविंद केजरीवांची जादू दिल्लीकरांवर चालणार याचा आपला अंदाज होता. तर दुसरीकडे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे शेवटपर्यंत स्पष्ट झालं नाही. किंवा त्यांनी ते केलं नाही. केजरीवाल यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना सभा आणि पत्रकार परिषदांमधून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत करण्याचं आव्हान केलं.

4 सकारात्मक जाहिराती - आम आदमी पक्षाने आपली संपूर्ण निवडणूक प्रचार सकारात्मक ठेवली. कुठल्याही नेत्याने कोणतीही भडक विधानं केली नाहीत. यासह सर्व कार्यकर्ते आणि नेते एकत्रितपणे त्यांच्या पाच वर्षांच्या कामाचा प्रचार करत राहिले. आम आदमी पार्टीने भाजपच्या विरोधातील मुद्द्यांवर निशाणा साधला. मात्र भाजपच्या बड्या नेत्यांवर आरोप करताना दक्षता घेतली.

5 . मोहल्ला क्लिनिक - केजरीवाल सरकारने सुरू केलेल्या मोहल्ला क्लिनिकला चांगलीच लोकप्रियता दिली. आम आदमी पार्टीने मोहल्ला क्लिनिकमधील गर्दीला मतांमध्ये रूपांतरित केलं. आप सरकारने मोहल्ला क्लिनिकच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आकर्षित केलं. जरी मोहल्ला क्लिनिकच्या मुद्द्यावरून भाजपने आम आदमी पार्टीला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी निकालामध्येही तो पूर्णपणे अयशस्वी दिसून आला.

--

भाजपने दिल्ली गमावली...पण मोदींनी सभा घेतलेल्या 2 जागांवर कोण जिंकलं?

शरद पवारांनी दिल्लीच्या आखाड्यात उतरवलेल्या एकमेव 'कमांडो'चं काय झालं?

First published: February 11, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या