शरद पवारांनी दिल्लीच्या आखाड्यात उतरवलेल्या एकमेव 'कमांडो'चं काय झालं?

शरद पवारांनी दिल्लीच्या आखाड्यात उतरवलेल्या एकमेव 'कमांडो'चं काय झालं?

केजरीवाल विरुद्ध भाजप अशा रंगलेल्या दिल्ली निवडणुकीत राष्ट्रवादीनेही एक उमेदवार दिला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपला दिल्लीच्या सत्तेबाहेर ठेवलं आहे. तर काँग्रेसला मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही खातं उघडता आलं नाही. केजरीवाल विरुद्ध भाजप अशा रंगलेल्या दिल्ली निवडणुकीत राष्ट्रवादीनेही एक उमेदवार दिला होता.

दिल्ली कँटोन्मेंटचे आमदार असलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांना त्यांच्या आम आदमी पक्षाने (आप)तिकीट नाकारलं. त्यानंतर कमांडो सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. कमांडो सुरेंद्र 'आप'च्या वतीने 2013 आणि 2015 च्या निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही वेळेला ते दिल्ली कँटोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून आले. हरियाणाच्या झज्जरमध्ये मूळ गाव असलेले सुरेंद्र यांचा मुंबईशी संबंध आहे आणि त्याचमुळे कदाचित शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना यावेळी उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत कमांडो सुरेंद्र? मुंबईशी काय आहे नातं?

कमांडो सुरेंद्र NSG मध्ये कार्यरत होते. नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात NSG कमांडो म्हणून ते 2008 मध्ये मुंबईत तैनात होते. त्या वेळी अजमल कसाब आणि इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांशी दोन हात करताना कमांडो सुरेंद्र जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी NSG मधून निवृत्ती घेतली. कमांडो सुरेंद्र यांना आपलं पेन्शन मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला होता. त्याच वेळी ते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या संपर्कात आले.

केजरीलावांच्या दिल्ली विजयाचा महाराष्ट्रात इफेक्ट; मोफत वीज, पाणी मागणीने धरला जोर

केजरीवाल यांनी कमांडो सुरेंद्र यांना आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य करून घेतले. 2013 मध्ये त्यांना आपची उमेदवारीही मिळाली आणि ते जिंकून आले. 2015 च्या निवडणुकीतही सुरेंद्र यांना त्याच दिल्ली कँटमधून उमेदवारी मिळाली. ते पुन्हा आमदार झाले. या वेळी मात्र अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. त्यात कमांडो सुरेंद्र यांचाही समावेश होता. त्यानंतर सुरेंद्र यांनी आपचार राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

सुरेंद्र यांचा निवडणुकीत दारूण पराभव

ऐनवेळी आपमधून राष्ट्रवादीत गेलेल्या सुरेंद्र सिंह यांना दिल्ली कँटोन्मेंटच्या जनतेनं स्वीकारलं नसल्याचं पाहायला मिळालं. त्यांचा निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून आपचे उमेदवार वीरेंद्रसिंह कडियान यांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादीकडून लढलेल्या सुरेंद्र सिंह यांना केवळ 904 मते मिळाली आहेत.

First published: February 11, 2020, 5:23 PM IST

ताज्या बातम्या