दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You - अरविंद केजरीवाल

दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You - अरविंद केजरीवाल

कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. माझ्या कुटुंबीयांनीही प्रचंड साथ दिली असं सांगत आज माझ्या पत्नीचाही वाढदिवस असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली 11 फेब्रुवारी : दिल्लीत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. हा दिल्लीकरांचा विजय असून त्यांनी आपल्या मुलावर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असं मत त्यांनी व्यक्त केलं. केजरीवाल म्हणाले, हा विकासाचा विजय आहे. आम्ही जी कामं केली त्याला लोकांनी पसंत केलंय. दिल्लीवालो.. गजब कर दिया, I Love You अशी सुरुवातच त्यांनी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांना प्रतिसाद दिला.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, देवानीही आम्हाला साथ दिली. कार्यकर्त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. माझ्या कुटुंबीयांनीही प्रचंड साथ दिली असं सांगत आज माझ्या पत्नीचाही वाढदिवस असल्याचं त्यांनी सांगितलं.

पत्नीच्या वाढदिवसाच्या केजरीवालांनी त्यांना विजयाचं गिफ्ट दिलं अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. दिल्लीचे निकाल स्पष्ट झाले असून दिल्लीकरांनी अरविंद केजरीवालांना पुन्हा 'आप'लसं केलंय. विधानसभेच्या 70 जापैकी आम आदमी पक्षाला बहुमतापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळाल्या आहेत. तर भाजपने आपला आलेख थोडा उंचावला असून 2015 पेक्षा पक्षाला थोड्याच जागा जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसची स्थिती जैसे थे असून काँग्रेसला आपलं खातंही उघडता आलं नाही. केजरीवालांनी रामभक्त हनुमानाचेही आभार मानले. हनुमानाच्या कृपेनेच शक्ती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

गौतम गंभीरकडून पराभूत झालेल्या AAPच्या महिला नेत्याने विधानसभेत मारली बाजी!

एक्झिट पोल्सनी दाखवलेल्या अंदाजानुसारच सर्व निकाल लागले हे स्पष्ट झालंय. मतमोजणीच्या सुरुवातीलाच 'आप'च्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती. 2015मध्ये फक्त 03 जागा मिळवणाऱ्या भाजपला यावेळी 07 वर थांबलाय. तर 'आप'ला 63 जागांवर आघाडी मिळालीय. 2015मध्ये'आप'ला तब्बल 67 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या मतांच्या टक्केवारीत मोठी वाढ झालेली असली तरी त्या मानाने त्यांना जास्त जागा मिळालेल्या नाहीत.

PHOTO : कोण आहे 'छोटा केजरीवाल'? ज्याची होतेय सोशल मीडियावर तुफान चर्चा

अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून भाजपने दिल्ली काबिज करण्याचं पाहिलेलं स्वप्न भंगलं आहे. गेल्या 22 वर्षांपासून दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर आहे. त्यामुळे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाही तर अरविंद केजरीवाल यांचाच करिष्मा चालल्याचं स्पष्ट झालंय.

First published: February 11, 2020, 4:04 PM IST

ताज्या बातम्या