भाजपने दिल्ली गमावली...पण मोदींनी सभा घेतलेल्या 2 जागांवर कोण जिंकलं?

भाजपने दिल्ली गमावली...पण मोदींनी सभा घेतलेल्या 2 जागांवर कोण जिंकलं?

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जानेवारी : अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपला देशाच्या राजधानीत रोखून धरत मोठा विजय संपादित केला. अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत हुशारीने आपली सर्व निवडणूक यंत्रणा हाताळली. तसंच भाजपकडून टाकला जाणारा प्रत्येक डाव प्रभावहीन केला.

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता. मात्र त्यांच्या प्रचाराचा भाजपला दिल्लीत विशेष फायदा झाला नसल्याचं निवडणूक निकालातून दिसत आहे. कारण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने दिल्लीतील 70 पैकी तब्बल 63 जागांवर आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. तर भाजपला अवघ्या 7 जागांवर आघाडी घेता आली आहे.

नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेतलेल्या विश्वासनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र मोदींची दुसरी सभा ज्या मतदारसंघात झाली त्या द्वारकामध्ये आपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मास्टरस्ट्रोक

दिल्लीची विधानसभा निवडणूकही नरेंद्र मोदी Vs अरविंद केजरीवाल अशी व्हावाी, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आला. कारण ज्या निवडणुका मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या जातात, तिथं भाजपला फायदा होतो, असं एकंदरित चित्र आहे. मात्र भाजपची ही खेळी केजरीवालांनी हाणून पाडली. अरविंद केजरीवाल यांनी थेट मोदींवर टीका करण्याचं टाळलं आणि हाच मुद्दा आपसाठी गेमचेंजर ठरला.

आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमनेही मोदींना लक्ष्य न करता दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावरच फोकस केला. त्यामुळे दिल्लीत केजरीवाल नाही तर कोण? असा सवाल 'आप'कडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे थेट केजरीवाल आणि मनोज तिवारी यांच्यात तुलना करण्यात आली. या सामन्यात केजरीवाल उजवे ठरले आणि आपने पुन्हा विजय खेचून आणला.

शरद पवारांची राज ठाकरेंवर घणाघाती टीका, भाजपचाही घेतला समाचार

केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांकडून होणारी अजून एक चूक टाळल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणजे केजरीवाल यांनी भाजपच्या पीचवर खेळण्याचं नाकारलं. भाजप मुद्दे उपस्थित करणार, आरोप करणार आणि त्यानंतर विरोधक स्वत:ला डिफेन्ड करत राहणार, हे गेल्या काही निवडणुकांतील समीकरण झालं आहे. केजरीवाल यांनी मात्र दिल्लीची निवडणूक दिल्लीच्याच प्रश्नांवर झाली पाहिजे, हे आग्रहाने आणि आक्रमकपणे मांडलं. परिणामी निवडणुकीत कलम 370, शाहीनबाग हे मुद्दे प्रभावी ठरले नाहीत.

First published: February 11, 2020, 5:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading