मराठी बातम्या /बातम्या /देश /Facebook वर जुळलं सूत, लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलानं बदललं लिंग; पण...नंतर घडला भयावह प्रकार

Facebook वर जुळलं सूत, लग्नासाठी महाराष्ट्रातल्या मुलानं बदललं लिंग; पण...नंतर घडला भयावह प्रकार

Representative Image

Representative Image

दिल्लीत (Delhi) एका विचित्र घटनेची नोंद झाली आहे.

नवी दिल्ली, 14 डिसेंबर: दिल्लीत (Delhi) एका विचित्र घटनेची नोंद झाली आहे. दिल्लीतील मोहन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये एक विचित्र तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. ही तक्रार फेसबूकवर (love cheating on Facebook) झालेल्या प्रेमाच्या फसवणुकीबद्दल आहे. फेसबूकवरुन एक मित्र एका मित्राच्या प्रेमात पडल्यानंतर मुलगी झाला आहे. त्यानं आपलं ऑपरेशन केलं आहे. असा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर अचानक ज्या व्यक्तीसाठी त्याने हे सर्व केले ती व्यक्ती फसवून पळून गेली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

24 वर्षीय पीडित तरुणी महाराष्ट्रातील रहिवासी आहे. ती महाराष्ट्रात कुटुंबासोबत राहत होती. पीडितेचे कुटुंब व्यवसायिक आहे. पीडितेने तक्रारीत लिहिले आहे की, तिची दिल्लीतील एका व्यक्तीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली, त्या व्यक्तीनं माझ्यासोबत खूप प्रेमाच्या गोष्टी केल्या आणि लग्नाचे आश्वासनही दिले.

हेही वाचा- Jammu & Kashmir: सुरनकोटमध्ये गोळीबार, जवानांकडून दहशतवाद्याला कंठस्नान

यानंतर पीडित मुलानं आपलं ऑपरेशन केलं आणि त्याचे लिंगही बदललं मुलगी झाल्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरुन पीडित मुलीनं आपलं कुटुंब आणि घरदार सोडून दिल्लीत राहायला आली. दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी त्या तरुणाशी भेट घेतली. या तरुणाने भाड्याचे घर घेतले होते आणि दोघांमध्ये शारीरिक संबंधही झाले.

अनेकवेळा मुलाने पीडितेवर बलात्कारही केला आणि लग्नाचे आश्वासनही दिले. काही दिवस हा प्रकार सुरू राहिला, मात्र त्यानंतर आरोपी मुलीला दिल्लीत सोडून पळून गेला. घर सोडून गेलेल्या मुलीने त्रासलेल्या अवस्थेत भटकत राहिल्यानं तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

हेही वाचा- Big News: करण जोहरचा Corona रिपोर्ट आला समोर

त्यानंतर दिल्लीच्या मोहन गार्डन पोलीस ठाण्यात बलात्कार आणि दुष्कर्म यासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहे. आरोपी पीडितेला आधी व्यावसायिक सांगत असे, मात्र पोलीस तपासात आरोपी एका शोरूममध्ये सेल्समन असल्याचं निष्पन्न झालं.

First published:

Tags: Delhi, Facebook, Rape accussed