श्रीनगर, 14 डिसेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) पुंछमधून चकमकीची बातमी समोर येत आहे. सुरनकोट सेक्टरमध्ये (Surankote sector of Poonch) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान जवानांना यश आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, लष्कर, सीआरपीएफ (CRPF)आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं घेराव आणि शोध मोहीम सुरू केली आहे. या परिसरात काही संशयित लोक लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. जेव्हा टीम संशयित ठिकाणाजवळ पोहोचली तेव्हा लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्यानंतर दहशतवाद्यांच्या गोळीबारावरही सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिलं.
One terrorist neutralised in an operation of the Indian Army and Jammu & Kashmir police in Behramgala, Surankote sector of Poonch. One AK-47 rifle and four magazines recovered: White Knight Corps, Indian Army
— ANI (@ANI) December 14, 2021
भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सनं सांगितले की, पूंछच्या सुरनकोट सेक्टरमधील बेहरामगला येथे भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. त्याच्याकडून एक एके-47 रायफल आणि चार मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक लोकांनी सुरनकोट सेक्टरमध्ये संशयित बंदूकधारी पाहिल्यानंतर लष्कराच्या जवानांनी शोध मोहीम सुरू केली. जंगलात झाडांच्या शर्यतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांना जवळ येताना पाहिल्यानंतर त्यांनी गोळीबार सुरू केला. हेही वाचा- ग्राहकांच्या खिशाला चाप..! गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. त्याच्याकडून 1 एके 47 आणि 4 मॅगझिन जप्त करण्यात आली आहेत. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण स्थानिक लोकांच्या मते, दहशतवाद्यांची संख्या दोन ते तीन असण्याची शक्यता आहे. लष्कराची कारवाई अजूनही सुरू आहे. श्रीनगर बस हल्ल्यात तीन पोलीस शहीद जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केलं आणि शहराच्या बाहेरील भागात पोलिसांच्या बसवर गोळीबार केला. यामध्ये या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांची संख्या तीन झाली आहे. या हल्ल्यात 13 पोलीसही जखमी झाले आहेत. हेही वाचा- श्रीनगर दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सर्वात धक्कादायक माहिती समोर मिळालेल्या माहितीनुसार, पंथा चौक परिसरात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनच्या बसला लक्ष्य केलं. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले, तर 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी एक एएसआय आणि एक सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल शहीद झाले आहे. जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर तीन बाजूंनी हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी दुचाकीवरून आले होते.