मुंबई, 14 डिसेंबर: कोरोनाचे (Corona Virus) संक्रमण काही प्रमाणात कमी झाल्यानंतर बॉलिवूडकरांनी (Bollywood Party) पार्ट्या आयोजित करण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक करण जोहरच्या (karan Johar) पार्टीमुळे बॉलिवूड कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. दरम्यान आता करण जोहरचाही कोरोना रिपोर्ट (Corona Report) आला आहे. मुंबई पालिकेच्या सुत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे. करण जोहरचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. फिल्म मेकर करण जोहर राहत असलेल्या क्वाँटम पार्क रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये 8 डिसेंबरला रात्री ४ तास पार्टी सुरू होती. याच पार्टीत बॉलिवूडचे सूपरस्टार सिलेब्रिटी देखील उपस्थित होते. करण जोहरनं आयोजित केलेल्या या पार्टीत स्व:त करण जोहर, करीना कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट, मलायका अरोरा, अमृता अरोरा, सीमा खान, महिप कपूर आणि मनिष मल्होत्रा उपस्थित होते. या सर्व बॉलिवूड सेलेब्रिटींची कोविड 19 संसर्ग चाचणी करण्यात आलीय. करीना कपूरला कोरोनाची लागण बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Tested Corona Positive) हिला कोरोनाची लागण झाली आहे. करीनासह तिची जवळची मैत्रिण आणि बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.
#UPDATE | The residence of Kareena Kapoor Khan has been sealed. She has not given proper information yet but our officers are trying to find out that how many people did come in contact with her: BMC (Brihanmumbai Municipal Corporation) pic.twitter.com/2xlgOHz0YT
— ANI (@ANI) December 13, 2021
सीमा खान आली होती कोरोना रुग्णाच्या संपर्कात सलमान खानची वहिनी आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानला (seema khan corona positive) देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. यासोबतच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरला (maheep kapoor corona positive ) देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. हेही वाचा- भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं इंडोनेशिया, त्सुनामीचाही इशारा; भीतीचं वातावरण विश्वसनिय वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल खानची पत्नी सीमा खान करन जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी होण्याआधी 7 डिसेंबर रोजी एका हाय रिस्क कोविड १९ संसर्ग बाधित रुग्णाच्या अत्यंत जवळ संपर्कात आली होती. त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झाली आणि या पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या ती संपर्कात आली. त्यामुळे करण जोहरच्या पार्टीत उपस्थित असलेले सर्व बॉलिवूड सेलेब्रिटी एका पाठोपाठ कोविड 19 संसर्ग बाधित झालेत.
Mumbai | Brihanmumbai Municipal Corporation's health department to conduct COVID19 testing at the apartment building of actor Kareena Kapoor Khan today
— ANI (@ANI) December 14, 2021
Khan who has tested positive for COVID19 has been advised home quarantine. pic.twitter.com/reYaNRlJDQ
महत्वाचे म्हणजे या पार्टीनंतर हे सर्व बॉलिवूड सेलेब्रिटी अनेकांच्या संपर्कात आलेत. त्यात त्याचे वैयक्तिक कर्मचारी आणि इतर दररोज भेटणाऱ्या व्यक्तींचाही समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता करण जोहरची पार्टी आता बॉलिवूड स्टार्ससाठी सूपर स्प्रेडर ठरताना दिसतेय.