मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकारी रुग्णालयाचे वाभाडे काढणाऱ्या भाजपच्या VIDEO वर मुख्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर की...

सरकारी रुग्णालयाचे वाभाडे काढणाऱ्या भाजपच्या VIDEO वर मुख्यमंत्र्यांनी दिलं असं उत्तर की...

केजरीवाल सरकारचं तथाकथित वर्ल्ड क्लास रुग्णालयाचं वास्तव, असं म्हणत भाजपने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर केजरीवालांनी कसं उत्तर दिलंय ते वाचायलाच हवं.

    नवी दिल्ली, 27 मे : Coronavirus चा प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेत नसला तरी आता या साथीबरोबर राजकारणही वाढताना दिसत आहे. देशभरात सगळीकडेच सत्ताधारी पक्षांना नागरिक आणि विरोधी पक्षांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दिल्लीत सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उत्तम राखल्याबद्दल केजरीवाल सरकारचं एकीकडे कौतुक होत असतानाच दिल्ली भाजपने सरकारी रुग्णालयात रुग्णाचे कसे हाल होतात हे दाखवणारा एक VIDEO शेअर केला. Twitter वर हा व्हिडीओ पडल्यानंतर अर्ध्या तासात खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्याची दखल घेतली आणि वर भाजपचे आभारही मानले. हे आहे केजरीवाल सरकारचं तथाकथित वर्ल्ड क्लास रुग्णालयाचं वास्तव, असं म्हणत भाजपने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये एका रुग्णालयाबाहेर रुग्णाला फुटपाथवर कसं थांबवलं जातं. स्ट्रेचरवर नेणाऱ्यांसाठी पीपीई किट सोडाच साधी चप्पलसुद्धा नाही. भाजपच्या या टीका करणाऱ्या पोस्टची दखल केजरीवालांनी झटकन घेतली आणि आमची व्यवस्था कुठे कमी पडतेय हे दाखवून दिल्याबद्दल धन्यवादही दिले. मी तातडीने हे कुठे घडलंय ते पाहायला सांगतो, असंही केजरीवाल यांनी लिहिलं आहे. आपण सर्वांनी या भीषण परिस्थितीत एकमेकांबरोबर काम करायला हवं, असंही केजरीवालांनी लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांचा बदललेला पवित्रा अनेक जणांना आवडला तर काहींनी त्यावरही शेरे मारले आहेत. अनेकांनी अरविंद केजरीवाल यांनी चूक मान्य करून दखल घेतल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. दिवसभर सोशल मीडियावर केजरीवा यांच्या या प्रत्युत्तराचीच चर्चा रंगली. अन्य बातम्या भारताचं मोठं पाऊल, एकाच वेळी होणार 50 हजार नमुन्यांची चाचणी पुण्यात अचानक का वाढला कोरोनाबाधितांचा आकडा, महापौरांनी केला महत्त्वाचा खुलासा कृपया लहान मुलांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी पालकांना का दिला असा सल्ला?
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Arvind kejriwal, Coronavirus

    पुढील बातम्या