मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात अचानक का वाढला कोरोनाबाधितांचा आकडा, महापौरांनी केला महत्त्वाचा खुलासा

पुण्यात अचानक का वाढला कोरोनाबाधितांचा आकडा, महापौरांनी केला महत्त्वाचा खुलासा

कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले होते. त्यामुळे पुणेकर नागरिकही काहीसे चिंतेत पडले.

कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले होते. त्यामुळे पुणेकर नागरिकही काहीसे चिंतेत पडले.

कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले होते. त्यामुळे पुणेकर नागरिकही काहीसे चिंतेत पडले.

    पुणे, 27 मे : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे अचानक वाढले होते. त्यामुळे पुणेकर नागरिकही काहीसे चिंतेत पडले. मात्र आता याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खुलासा केला आहे. 'सोमवारी आलेली कोरोनाबाधितांची 399 ही संख्या 22, 23, 24 मे या तीन दिवसांच्या शिल्लक सॅम्पलची आहे, असं स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी दिलं आहे. 'आपण घेतलेले सॅम्पल तपासणीसाठी NIV कडे पाठवले जातात. मात्र NIV कडेही क्षमतेपेक्षा अधिकचे काम सुरु असल्याने काहीसा वेळ लागत आहे. त्यामुळे 399 ही संख्या अधिक दिसल्याने भीती निर्माण झाली. सॅम्पल कलेक्शन आणि टेस्टिंग वेगाने-कमीत कमी वेळात व्हावे, म्हणून आपण राज्य सरकारकडे पुणे शहराला तातडीनं नवी टेस्टिंग लॅब सुरु करावी, अशी मागणी केली आहे. मागणीनंतर यावर सकारात्मक निर्णय झालेला तर आहेच, शिवाय यासाठी आपली महापालिका निधीही द्यायला तयार आहे. ही प्रक्रिया गतीने व्हावे, ही पुनःश्च विनंती,' असंही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले. काय आहे पुण्यातील मागील दोन दिवसांची स्थिती? पुणे शहरात 26 मे रोजी नव्याने 246 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 5 हजार 427 झाली आहे. तर 140 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 2 हजार 279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 26 मे रोजी 09 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 43 हजार 907 झाली असून आज 2 हजार 044 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. पुणे कोरोना अपडेट : सोमवार, 25 मे पुणे शहरात 25 मे रोजी नव्याने 399 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 5 हजार 181 झाली आहे. तर 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 2 हजार 182 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 25 मे रोजी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील एकूण तपासणी आता 41 हजार 863 झाली असून आज 689 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. संपादन, संकलन - अक्षय शितोळे कोरोना लॉकाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Coronavirus, Pune news

    पुढील बातम्या