नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

दिल्लीमध्ये सरासरी दररोज दिल्लीमध्ये दोनपेक्षा जास्त मुलींवर बलात्कार होत आहेत

Madhura Nerurkar | News18 Lokmat | Updated On: Jul 5, 2018 11:55 AM IST

नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

नवी दिल्ली, 5 जुलै: राजधानी दिल्लीत नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. दिल्ली येथील आदर्श नगर परिसरातील एका मुलावर 8 वर्षांच्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. स्वतः मुलगाही अल्पवयीन असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी एका स्थानिक रुग्णालयातून पोलिसांना कळले की त्यांच्याकडे एका मुलीला भरती करण्यात आले असून तिच्या गुप्तांगामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. मुलीला याबद्दल विचारले असता तिने सांगितले की, आई- बाबा बाहेर गेल्यावर पीडितेच्या मोठ्या भावाने जबरदस्ती केली. सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: आता गुहेतच 'त्या' मुलांना दिल जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवालने बुधवारी पीडितेची भेट घेतली. महिला आयोगाने प्रसिद्ध केलेल्या एका विधानात सांगितले की, पीडितेचे आई- बाबा फार गरीब आहेत. ते मजूरीचे काम करतात. पीडितेची एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागली असून तिची तब्येत अजूनही गंभीर आहे. स्वाती पुढे म्हणाल्या की, महिला आयोग पीडितेला शक्य तितक्या सर्वप्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून!

दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्कारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितलेल्या आकड्यांनुसार, सरासरी दररोज दिल्लीमध्ये दोनपेक्षा जास्त मुलींवर बलात्कार होत आहेत. गेल्यावर्षी 30 एप्रिलपर्यंत बलात्कारविरोधात 278 गुन्हे दाखल झाले होते. तर यावर्षी 282 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे.

Loading...

हेही वाचा: VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...