VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

घरच्या गोठ्यात शिरलेल्या कोंबड्याना एक नाग भक्ष्य बनवत असल्याचं दिसून आलं. ग्रामस्थानी या नागाला पकडण्यासाठी सर्पमित्र उमेश झिरे याना पाचारण केले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 4, 2018 09:06 PM IST

VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

गडचिरोली, 04 जून : 'अंथरून बघून पाय पसरा' असा सल्ला नेहमी वडिलधारी व्यक्ती देत असतात. पण काय आहे ना अति करण्याची सवय काही महाभागांची सुटत नाही. असाच प्रसंग सापावर उलटला. सापाने नाही नाही म्हणता नऊ अंडी गिळली.

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मरेगाव येथे आज सकाळी अनोखा प्रकार नजरेस पडला. या गावातील शामराव चुधरी यांच्या घरच्या गोठ्यात शिरलेल्या कोंबड्याना एक नाग भक्ष्य बनवत असल्याचं दिसून आलं. ग्रामस्थानी या नागाला पकडण्यासाठी सर्पमित्र उमेश झिरे याना पाचारण केले.

तोवर नागाने दंश करून २ कोंबड्या मारल्या. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोचताच नागाला पकडल्यावर त्याने गिळलेली कोंबडीची ९ अंडी बाहेर काढली. हा नाग पकडला गेल्याने मरेगावच्या ग्रामस्थांना सुटेकचा श्वास घेतला.

अत्यंत घातक ठरू शकणारा हा नाग पकडला गेल्यावर अंडी बाहेर काढतानाचे दृश्य मात्र नागरिकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरले.

हेही वाचा

मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

पश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली, अंधेरी- चर्चगेट स्लो ट्रॅकवरच्या गाड्या रद्द

मुंबईचा खरा वाली कोण, केव्हा संपणार नागरिकांची दशा?

सोशलकल्लोळ : म्हणे,अंधेरी पुल दुर्घटनेत 'धोनी' जखमी ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close