आता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

आता गुहेतच 'त्या' मुलांना दिलं जाणार पोहण्याचं प्रशिक्षण

ही मुलं ज्या गुहेत अडकली आहेत त्या गुहेत पाणी भरलं असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जुलै: थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघाचा शोध लागला असला तरी त्यांना त्या गुहेतून बाहेर काढणं अद्याप शक्य झालेलं नाही. 12 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक असे एकूण 13 जणं या गुहेत अडकली आहेत. नऊ दिवसांच्या अथक प्रयत्नांनी या मुलांचा शोध लागला असला तरी त्यांना बाहेर काढण्यात थायलंड सरकारला अद्याप यश आलेलं नाही. ही मुलं ज्या गुहेत अडकली आहेत त्या गुहेत पाणी भरलं असून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे.

हेही  वाचा: VIDEO : बापरे!,दोन कोंबड्या मारून सापाने गिळली नऊ अंडी

सुरक्षेच्या दृष्टीनेच मुलांना गुहेमध्येच पोहण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलांना या साऱ्या गोष्टी अगदी कमी वेळेत शिकाव्या लागणार असल्याची माहिती थायलंडचे उपपंतप्रधान प्रावित वोंगसुवान यांनी दिली. मुलांना अधिकाधिक मानसिक बळ देण्याचे सर्वपरिने प्रयत्न केले जात आहे. मुलांपर्यंत सर्व वैद्यकीय मदत पोहोचवण्यात आली असून त्यांना अन्नाचाही पुरवठा केला जात आहे.

हेही वाचा: सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला चांगलं पेन्शन हवं? मग ही गुंतवणूक कराच

गुहेतून बाहेर पडण्याची जागा छोटी असल्यामुळे गुहेत बाहेरून मदत करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. थायलंडच्या नेव्ही सीलच्या पथकाने या बचाव मोहिमेच्या कामाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तसेच गुहेतून पाणी उपसण्याची काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जर पाण्याची पातळी कमी झाली आणि प्रवाहाची गती मंदावली तर मुलांना बाहेर काढणे सहज शक्य होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

23 जून रोजी वाईल्ड बोअर फुटबॉल टीमची ही मुलं थांम लुआंग नांग नोन गी गुहा पाहण्यासाठी गेली होती. गुहेत फार आत गेल्यावर अचानक पावसाचा जोर वाढला आणि त्यांना बाहेर पडणं अशक्य झालं. मुलांना गुहेतून बाहेर काढण्याचे सर्व पर्याय पडताळून पाहण्यात येत आहेत. यात दोन मुख्य पर्याय म्हणजे मुलांना गुहेतच पोहण्याचे आणि पाण्यात डुबकी मारण्याचे प्रशिक्षण देऊन गुहेतून बाहेर काढायचे किंवा गुह वरुन खोदून त्यांना बाहेर काढायचे. पण या दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायाचा जरी सरकारने विचार केला तरी मुलांना काही दिवस आतच अडकून राहावे लागणार आहे. या टीमला वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत घेण्यात येत आहे. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया आणि यूके येथून अनेक तज्ज्ञांना थायलंडमध्ये बोलावण्यात आले असून बचाव कार्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली जात आहे.

हेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी येतोय भारतीय क्रिकेट कोच बनून!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 5, 2018 07:29 AM IST

ताज्या बातम्या