मराठी बातम्या /बातम्या /देश /

सासूच्या हत्येसाठी विषारी सापाचा वापर; सुनेचा प्रताप पाहून कोर्टही हैराण, धक्कादायक कारण उघड

सासूच्या हत्येसाठी विषारी सापाचा वापर; सुनेचा प्रताप पाहून कोर्टही हैराण, धक्कादायक कारण उघड

Crime News: सुनेनं सुनियोजित पद्धतीनं कट रचून सासूचा काटा काढला आहेत. त्यासाठी तिने चक्क एका विषारी नागाचा वापर केला आहे.

Crime News: सुनेनं सुनियोजित पद्धतीनं कट रचून सासूचा काटा काढला आहेत. त्यासाठी तिने चक्क एका विषारी नागाचा वापर केला आहे.

Crime News: सुनेनं सुनियोजित पद्धतीनं कट रचून सासूचा काटा काढला आहेत. त्यासाठी तिने चक्क एका विषारी नागाचा वापर केला आहे.

  • Published by:  News18 Desk
जयपूर, 07 ऑक्टोबर: सतत होणाऱ्या वादाला कंटाळून एका सुनेनं चक्क आपल्या सासूची निर्घृण हत्या (Daughter in law killed mother in law) केली आहे. यासाठी आरोपी सुनेनं सुनियोजित पद्धतीनं कट रचून सासूचा काटा काढला आहेत. सासूची हत्या करण्यासाठी आरोपी महिलेनं चक्क एका विषारी नागाचा (used Venomous snake for murder) वापर केला आहे. तसेच हत्या केल्यानंतर नाग चावल्याचा बनाव रचला होता. पण आरोपीचा हा बनाव फार काळ टिकला नाही. संशय आल्यानंतर पोलिसांनी या हत्येच्या घटनेचा पर्दाफाश केला आहे. तसेच आरोपी महिलेला विषारी साप देणाऱ्या गारुड्याला देखील ताब्यात घेतलं आहे. ही घटना राजस्थानातील आहे. नेमकं प्रकरण काय आहे? काही दिवसांपूर्वी आरोपी महिलेचा विवाह भारतीय सैन्य दलातील एका जवानासोबत झाला होता. पण पती सैन्यात असल्यानं आरोपी महिलेचं अन्य एका तरुणासोबत सूत जुळलं होतं. त्यामुळे ती तासन् तास आपल्या प्रियकरासोबत फोनवरून बोलायची. फोनवर सतत कोणाशी बोलते यावरून सासू तिला नेहमी विरोध करायची. दुसरीकडे सासरा देखील नोकरीच्या निमित्ताने बाहेर असायचे त्यामुळे आरोपी महिलेला कोणाचाही धाक उरला नव्हता. त्यामुळे फोनवर बोलण्यावरून सतत अडवणूक करते म्हणून सुनेनं आपल्या सासुच्या हत्येचा कट रचला. हेही वाचा-भयंकर! नणंदेच्या स्वभावाला वहिनी वैतागली; आंधळी कोशिंबीर खेळताना असा काढला काटा आरोपी महिलेनं आपल्या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीनं झुनझुनु जिल्ह्यातून एक विषारी साप मागवला. यानंतर आरोपीनं 2 जून 2018 सापाला एका बॅगमध्ये ठेवून ही बॅग सासूच्या खोलीत ठेवली. यामुळे रात्री झोपेत असणाऱ्या सासूला सापाने दंश केला. यानंतर सकाळी सुनेनं सासूचा मृत्यू झाल्याचं पाहिल्यानंतर आरडाओरडा करायला सुरुवात केली. तसेच सासूला नजीकच्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत सासूचा मृत्यू झाला होता. हेही वाचा-अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सुनेचा कॉल तपशील चेक केला. दरम्यान हत्येच्या दिवशी सुनेच्या फोनवर एका नंबरवरून तब्बल शंभरहून अधिक वेळा कॉल आल्याचं पोलीस तपासात समोर आलं. यामुळे पोलिसांना संशय आल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. तसेच मागील काही दिवसांपासून दोघं सतत संपर्कात असल्याचं देखील कॉल डिटेलवरून पोलिसांना समजलं. हेही वाचा-लघवीला गेला अन् 97 लाखांना मुकला; पुण्यातील व्यावसायिकासोबत घडली विपरीत घटना याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. तसेच पोलिसांनी विषारी साप पुरवणाऱ्या व्यक्तीला देखील ताब्यात घेत त्याला साक्षीदार बनवलं आहे. याप्रकरणाची सुनावणी कोर्टात ऐकल्यानंतर कोर्ट देखील हैराण झालं आहे.
First published:

Tags: Crime news, Rajasthan

पुढील बातम्या