• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून दोनदा बलात्कार; पोलिसांना भयावह अवस्थेत आढळला आरोपी

Rape in Virar: विरारमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीनं जबरदस्तीने बलात्कार केला (Minor Girl Raped by neighbour) आहे.

 • Share this:
  विरार, 07 ऑक्टोबर: विरार येथील तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराशेजारी राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीनं जबरदस्तीने बलात्कार केला (Minor Girl Raped by neighbour) आहे. पीडित मुलगी दुकानात गेली असता, आरोपीनं तिला स्वत:च्या घरात जबरदस्तीनं घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तुळिंज पोलिसांत फिर्याद दाखल (FIR lodged) केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोमवारी सामान आणण्यासाठी दुकानात गेली होती. दरम्यान पीडितेच्या इमारतीत राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीनं पीडितेला स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आहे. या घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नराधम व्यक्तीचा कांड समोर येताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तातडीनं तुळिंज पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-डोंबिवली हादरली, तरुणाचा आढळला छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, तुळिंज पोलीस आरोपीला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले पण पोलिसांनी भयावह अवस्थेत आरोपी आढळला आहे. पोलिसांना आरोपीचा मृतदेह आत्महत्या केलेल्या अवस्थेत (Rape accused commits suicide in virar) आढळून आला आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर कारवाईच्या भीतीनं आरोपीनं आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे. पण आरोपीच्या आत्महत्येचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नसून पोलीस याचा तपास करत आहेत. हेही वाचा-SEXTORTION! मुलगी बनून तरुणांनी केला कॉल, अश्लील VIDEO बनवून केलं ब्लॅकमेल धक्कादायक बाब म्हणजे आरोपीनं यापूर्वी देखील पीडित मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं होतं. आरोपीनं पीडितेवर दुसऱ्यांदा अत्याचार केल्यानंतर, त्याच्याविरोधात नातेवाईकांनी तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या आत्महत्येमागील नेमक्या कारणाचा शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी तुळिंज पोलिसांनी मृत आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपीच्या मृत्यूबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: