पुणे, 07 ऑक्टोबर: पुण्यातील हडपसर परिसरात एक विचित्र घटना समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघवीला जावून येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात (Driver fraud with owner) आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन चालक (driver theft 97 lakh from car) फरार झाला आहे. संबंधित घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. विजय हुलगुंडे असं फरार आरोपी चालकाचं नाव असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकानं हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण सोमवारी 97 लाख रुपयांची रक्कम बघून चालकानं व्यावसायिकाला गंडा घातला आहे. हेही वाचा- नोकरी रेंजरची आणि प्रॉपर्टी करोडोंची, किरकोळ प्रकरणामुळे अधिकारी अडकला जाळ्यात नेमकं काय घडलं? फिर्यादी व्यावसायिक सोमवारी व्यावसायिक रक्कम घेऊन कोंढव्यातून हडपसरकडे येत होते. दरम्यान त्यांना लघुशंका आल्याने त्यांनी कल्याणीनगर परिसरात चालकाला गाडी थांबवण्यास सांगितली. गाडी रस्त्याच्या कडेला लावण्यास सांगत फिर्यादी लघवी करण्यासाठी गाडीतून बाहेर आला. दरम्यान पैशांनी भरलेली बॅग गाडीतच ठेवली होती. हेही वाचा- सैन्यात नोकरीचं अमिष देऊन लुबाडणूक, बोगस सैनिकाला ठोकल्या बेड्या याची संधी साधत आरोपी चालकानं काही अंतर गाडी पुढे नेऊन उभी केली. त्यानंतर काही वेळातचं पैशाची बॅग घेऊन पळ काढला आहे. फिर्यादी लघवी करून परत येईपर्यंत चालक आणि पैसे दोन्ही गायब होते. याप्रकरणी फिर्यादीनं हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.