मराठी बातम्या /बातम्या /देश /The Kashmir Files चित्रपटावर कमेंट करणं दलित व्यक्तीला पडलं महागात, मंदिरात नाक घासून मागावी लागली माफी

The Kashmir Files चित्रपटावर कमेंट करणं दलित व्यक्तीला पडलं महागात, मंदिरात नाक घासून मागावी लागली माफी

The Kashmir Files

The Kashmir Files

मेघवाल यानं देवांबद्दलच्या पोस्टवरती काही अपमानास्पद टिप्पण्यांसह प्रतिक्रिया दिली. यामुळं लोक चिडले. नंतर, त्यानं राम आणि कृष्ण यांच्यावर टिप्पण्या केल्याबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. परंतु काही स्थानिकांनी त्याला मंदिरात माफी मागण्यास भाग पाडलं.

पुढे वाचा ...

अलवर, 23 मार्च : 'द काश्मीर फाइल्स' (the kashmir files) चित्रपटावर टीका केल्याबद्दल सोशल मीडियावरील टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून हिंदू देवतांचा अवमानकारक टिप्पणी (insulting hindu gods) केल्यामुळं एका दलित व्यक्तीला एका मंदिराच्या फरशीवर नाक घासण्यास भाग पाडण्यात आलं, असं पोलिसांनी बुधवारी सांगितलं. या प्रकरणी मंगळवारी रात्री ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. दलित व्यक्तीचा छळ (dalit person atrocity) केल्याबद्दल आणखी काही लोकांनाही अटक करण्यात आली आहे, असं बेहरोरचे मंडल अधिकारी (सीओ) आनंद कुमार यांनी सांगितलं.

ही घटना बेहरोर पोलीस ठाण्यांतर्गत मंगळवारी घडली. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात पीडित राजेश कुमार मेघवाल मंदिरात उपस्थित लोकांच्या दबावाखाली नाक घासताना दिसत आहे. सीओ म्हणाले की, खासगी बँकेत काम करणाऱ्या मेघवालने दोन-तीन दिवसांपूर्वी फेसबुकवर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली होती. त्यानं या चित्रपटाविरोधात एक पोस्ट लिहिली होती, ज्यावर टीकात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या.

या दलित व्यक्तीनं ‘अत्याचार केवळ पंडितांवर झाला होता, दलितांवर झाला नाही का, असा सवाल पीडित व्यक्तीनं फेसबुक पोस्टमध्ये केला आहे. गरीबांवर रोज अत्याचार होत असून त्यांच्या सुरक्षेच्या नावाखाली काहीही नाही,’ असं लिहून सोशल मीडियावर शेअर केलं होतं. मेघवालच्या या चित्रपटावरील पोस्टला प्रतिसाद म्हणून काही लोकांनी ‘जय श्री राम’ आणि ‘जय श्री कृष्ण’ लिहिलं. यानंतर

मेघवाल यानं देवांबद्दलच्या पोस्टवरती काही अपमानास्पद टिप्पण्यांसह प्रतिक्रिया दिली. यामुळं लोक चिडले. नंतर, त्यानं राम आणि कृष्ण यांच्यावर टिप्पण्या केल्याबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. परंतु काही स्थानिकांनी त्याला मंदिरात माफी मागण्यास भाग पाडलं. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ही घटना घडली. काल त्याला एका मंदिरात नेण्यात आलं, जिथं त्यानं माफी मागितली.

सीओ आनंद कुमार म्हणाले, "तिथं उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला मंदिरात नाक घासण्यास भाग पाडलं आणि त्यानं त्याप्रमाणं केलं." सीओ म्हणाले.

हे वाचा - VIDEO : तुम्हीच तेव्हा मुख्यमंत्री होतात...काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर फारुख अब्दुल्ला संतापले, म्हणाले..

मायावतींची (Mayawati) राजस्थानमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी

राजस्थानमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार दलित आणि आदिवासींना संरक्षण देण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, बसप अध्यक्ष मायावती (BSP Chief Mayawati) यांनी बुधवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यांनी राजस्थानमधील दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून आपला मुद्दा मांडला.

हे वाचा -हिंदू मंदिरांच्या परिसरात मुस्लिमांच्या स्टॉलला बंदी, हिजाबनंतर नवा वाद

राजस्थानमधील काँग्रेस सरकारच्या काळात दलित आणि आदिवासींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अलीकडेच दिडवाना आणि ढोलपूरमध्ये दलित मुलींवर झालेला बलात्कार, अल्वरमध्ये एका दलित तरुणाची ट्रॅक्टरखाली चिरडून हत्या आणि पाली, जोधपूरमध्ये दलित तरुणाची हत्या या घटनांनी दलित समाज हादरला आहे,' असं मायावती यांनी हिंदीमध्ये ट्विट करत म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये विशेषतः दलित आणि आदिवासींच्या संरक्षणात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे, हे स्पष्ट आहे, असं त्या पुढं म्हणाल्या. तेव्हा, हे सरकार बरखास्त करून तिथं राष्ट्रपती राजवट लागू करणं योग्य ठरेल, ही बसपची मागणी आहे, असं मायावती म्हणाल्या.

First published:

Tags: Dalit, Jammu kashmir, Rajasthan