मुंबई, 23 मार्च : राज्यात मागच्या आठवड्यात झालेल्या पावसाने सुमारे हजारो एकर शेतीपिकांचे नुकसान झाले. दरम्यान बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 24 तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Success Story : सेंद्रीय पद्धतीची कमाल, सोलापूरच्या शेतकऱ्यानं घेतलं गव्हाचं विक्रमी उत्पादन, Video
तर (दि.24) राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा जाणवत आहे. बुधवारी (ता. 22) सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यतील उच्चांकी 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान 29 ते 35 अंशांच्या दरम्यान होते. तर किमान तापमानाचा पारा बहुतांश ठिकाणी 13 अंशांच्या पुढे कायम आहे.
तमिळनाडूपासून, कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाहदेखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज (दि.23) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज असून, उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून राज्याच्या विविध भागात विजांसह वादळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
जेव्हा कुत्र्यांसमोर जंगलाचा राजा बनला 'भीगी बिल्ली'; सिंहाने घाबरून ठोकली धूम, पाहा VIDEO
दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 29.8 (14.9), अहमदनगर 30.0 (15.8), जळगाव 31.7 (16.5), धुळे 31.5 (13.2), कोल्हापूर 32.8 (19.2), महाबळेश्वर 21.8 (11.2), नाशिक 29.4 (16.2), निफाड 30.6 (13.5), सांगली 32.6 (18.7), सातारा 29.3 (15.8), सोलापूर 34.8 (20.4), सांताक्रूझ 31.6 (22.4), डहाणू 31.6 (21.9), रत्नागिरी 31.8 (21.4), छत्रपती संभाजीनगर 30.8 (19.0) , नांदेड (20.6), परभणी 33.3 (20.6), अकोला 32.9 (19.7), अमरावती 32.6 (19.4), बुलडाणा 30.8 (20.2), ब्रम्हपूरी 34.1 (20.6), चंद्रपूर 35.8 (21.0), गडचिरोली 31.2 (17.8), गोंदिया 31.0 (20.4), नागपूर 33.2 (21.6), वर्धा 34.1 (21.4), वाशिम 33.2 (18.8), यवतमाळ 34.5 (21.2) तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cyclone, Maharashtra rain updates, Weather Update, Weather Warnings, West bengal