Home /News /national /

हैदराबाद बलात्कारानंतर पुन्हा हादरला देश, 14 वर्षीय मुलीने विरोध केला म्हणून जिवंत जाळलं

हैदराबाद बलात्कारानंतर पुन्हा हादरला देश, 14 वर्षीय मुलीने विरोध केला म्हणून जिवंत जाळलं

पीडित मुलगी 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे.

    बेमेतारा (छत्तीसगड): हैदराबादमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर आज देश पुन्हा एकदा हादरला आहे. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीने बलात्काराचा प्रयत्न हाणून पाडल्यानं दोन विद्यार्थ्यांनी तिला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये घडला आहे. यामध्ये पीडित मुलगी 80 टक्के भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आरोपी पीडित विद्यार्थ्यीनीच्या शाळेतीलच वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत. यातील एक अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील बेमेतारा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. मृत्यूपूर्वी पीडित विद्यार्थीनीने गावातील दोन तरुणांनी तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. बेमेतारा जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या 22 तारखेला जिल्ह्यातील दाढी पोलीस स्टेशन भागात दोन तरुणांनी मुलीला जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीला रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. Covid-19 : गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी पीडितेच्या घराजवळच तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्यांना चोख उत्तर दिलं आणि पळ काढला. पण यावेळी आरोपींनी पीडितेवर तेल ओतून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून या घटनेनंतर पीडितेला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तिथे तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे रायपूरमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं. यावेळी मुलीने पोलिसांना बलात्काराची माहिती दिल्याचंही सांगण्यात येत आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, रायपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून बेमेतारा पोलिसांकडे पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपोर्ट
     संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Case of rape

    पुढील बातम्या