Home /News /news /

मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपोर्ट

मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपोर्ट

कोरोना बाजूला मुंबईत ऑक्सिजनच्या अभावामुळेच रुग्णालयात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. केईएम रुग्णालयाची हीच स्थिती आहे असा आरोप रूग्णांकडून करण्यात आला आहे.

    मुंबई, 25 जून : राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबईत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबईचं केईएम रुग्णालय हे कोरोना रुग्णांच्या मृत्यू केंद्र बनलं आहे. गेल्या 36 दिवसांत 460 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ऑक्सिजन अभावी रुग्णांचा बळी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आम्हाला रुग्णालयांची भीती असल्याची प्रतिक्रियाही नागरिकांकडून देण्यात आली आहे. राज्यात कोरोना विषाणूमुळे दररोज बऱ्याच लोकांचा मृत्यू होत आहे. पण कोरोना बाजूला मुंबईत ऑक्सिजनच्या अभावामुळेच रुग्णालयात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. केईएम रुग्णालयाची हीच स्थिती आहे असा आरोप रूग्णांकडून करण्यात आला आहे. पण असा कोणताही प्रकार रुग्णालयात घडत नसल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाकाडून देण्यात आली आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयात गेल्या 20 दिवसात 221 लोकांचा मृत्यू झाला तर 15 मे पासून या रुग्णालयात एकूण 460 मृत्यू झाले आहेत. कमी वेळात मृत्यूची संख्या या रुग्णालयात जास्त असल्यामुळे रुग्णांकडून असा आरोप केला जात आहे. हॉस्पिटलमधील कोरोना रूग्णांसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे होणारे मृत्यू. इथं येणाऱ्या रूग्णांची कुटुंबंही घाबरली आहेत. का बनलं केईएम मृत्यूचं केंद्र? - केईएम रुग्णालयाचं नाव घेतलं तर सगळ्यांनाच वॉर्डमध्ये पडलेले मृतदेह दिसतात. इथे मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आहेत. खरंतर, गेल्या 15 मे पर्यंत या रुग्णालयात 460 हून अधिक लोक मरण पावले आहेत. ज्यात 1 मे ते 31 मे दरम्यान दररोज सरासरी 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. - त्यानुसार 1 जून ते 20 जून या कालावधीत एकूण 240 जणांची नोंद झाली आहे, म्हणजे दररोज 11 रुग्ण मरत आहेत. - खुद्द केईएम रुग्णालयाच्या डीनने याची खातरजमा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा हाहाकार माजला आहे. 15 मे ते 20 जून या कालावधीत होणारे मृत्यू दुर्दैवी आहेत. - दरम्यान, केईएममध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती माध्यमांमध्ये येताच डीन देशमुख यांनी यावर माहिती दिली. रुग्णालयात 11 हजार लिटर ऑक्सिजनची तरतूद असून टॉप-अप सिस्टम अवलंबली जात असल्याचं देशमुख म्हणाले. म्हणजेच जेव्हा 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक असेल तर लगेच भऱलं जातं. - डीन यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे हे खरं आहे. पण त्याचं मृत्यूचं कारण ऑक्सिजनची कमतरता आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण अनेकदा रुग्ण रूग्णालयात दाखल होईपर्यंत उशिरा होतो. त्यात काही रुग्णांना आधीपासून अनेक आजार असतात. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus

    पुढील बातम्या