Covid-19 Updates: गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी

Covid-19 Updates: गेल्या 24 तासांत कोरोना वाढला की कमी झाला? पाहा लेटेस्ट आकडेवारी

एका दिवसांत वाढलेल्या रुग्णांमुळे देशात एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली आहे. या दरम्यान, 418 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांची संख्या 14894 पर्यंत पोहोचली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : देशात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण  आहे. अशात देशात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 16 हजार 922 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुशे एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचली आहे. या दरम्यान, 418 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांची संख्या 14894 पर्यंत पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 13012 लोक बरे झाले आहेत आणि आतापर्यंतचा रुग्ण बरा होण्याचा आकडा हा 2 लाख 71 हजार 697 इतका आहे. खरंतर एकीकडे रुग्णांचा आकडा वाढला असला तरी रुग्ण बरे होण्य़ाचा दरही वाढत आहेत. त्यामुळे ही नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे.

देशात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एक लाख 42 हजार 900 लोकांना संसर्ग झाला असून राज्यात 6739 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 73 हजार 792 रुग्णांनी कोरोनावर मात करून ते बरे झाले आहेत तर एकूण 62,369 इतक्या केसेस अॅक्टीव्ह आहेत.

लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून

देशाची राजधानी दिल्लीतही 70 हजार 390 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इथे कोरोनामुळे 2365 लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये 67 हजार 468 लोक संक्रमित झाले असून 866 लोक मरण पावले आहेत. गुजरातमध्ये 28 हजार 943 कोरोनाची प्रकरणं असून 1735 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 19 हजार 557 लोकांना संसर्ग झाला असून 596 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या आकड्यांचा अभ्यास केला असता, सलग दुसर्‍या दिवशी देशात 2 लाखाहून अधिक नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 2 लाख 7 हजार 871 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात 75 लाख 60 हजार 782 लोकांची कोरोना चाचणी झाली आहे.

मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपोर्ट

संपादन - रेणुका धायबर

First published: June 25, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या