Home /News /crime /

लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून

लॉकडाऊनमध्ये पार्किंगचा वाद हत्येपर्यंत पोहोचला, सपासप वार करून महिलेचा खून

पार्किंगच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे.

    नागपूर, 25 जून : राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण अशात गुन्हेगारी घटना काही कमी झाल्या नाही. लॉकडाऊनमध्येही अनेक हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. असंच एक प्रकरण नागपुरात समोर आलं आहे. पार्किंगच्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरती गिरडकर असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. नंदनवन गल्ली नंबर 5 मध्ये राहतात. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात पार्किंगचा वाद आहे. त्याच वादातून आरोपीने त्यांच्या धारदार शस्त्राने वार केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सेंटर, वाचा धक्कादायक रिपोर्ट तर एकनाथ टपरे असं आरोपीचं नाव आहे. घराजवळील पार्किंगमुळे आरती आणि एकनाथ यांच्या मोठा वाद झाला. याचा रागातून एकनाथ यांनी आरतीची हत्या केली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आसली आणि आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पण दरम्यान, या हल्ल्यामध्ये आरती यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आला आहे. तर पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. खरंतर रात्रीच्या सुमारास झालेल्या आ घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    पुढील बातम्या