Home /News /national /

16 कोटीच्या इंजेक्शनशिवाय चिमुरड्याचे प्राण वाचणं होत अशक्य, विरुष्कासह हे सेलिब्रिटी धावले मदतीला

16 कोटीच्या इंजेक्शनशिवाय चिमुरड्याचे प्राण वाचणं होत अशक्य, विरुष्कासह हे सेलिब्रिटी धावले मदतीला

या सेलिब्रिटी दाम्पत्याने अयांश गुप्ता (Ayansh Gupta) नावाच्या एका छोट्या मुलाचे प्राण वाचवल्याचंही समोर आलं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मीळ विकाराशी तो लढा देत आहे.

    नवी दिल्ली, 25 मे: क्रिकेट टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि  बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे दाम्पत्य गेल्या काही काळापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave of Coronavirus) देशवासीयांना भरभरून मदत करत आहेत. कोविड-19च्या (Covid19) उपचारांकरिता गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया कॅम्पेनद्वारे निधीही उभा केला होता. दरम्यान, या व्यतिरिक्त या सेलिब्रिटी दाम्पत्याने अयांश गुप्ता (Ayansh Gupta) नावाच्या एका छोट्या मुलाचे प्राण वाचवल्याचंही समोर आलं आहे. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मीळ विकाराशी तो लढा देत आहे. त्याच्यावरच्या उपचारांसाठी झोल्गेन्स्मा (ZolgenSMA) नावाच्या औषधाची गरज होती. हे औषध जगातल्या अत्यंत महागड्या औषधांपैकी एक असून, त्याची किंमत तब्बल 16 कोटी रुपये आहे. एका औषधासाठी एवढे पैसे मोजणं श्रीमंतांनाही सहज शक्य नाही, तिथे कोणा सर्वसामान्य माणसांकडे एवढे पैसे असणं शक्यच नाही. पण अयांशच्या आईवडिलांनी हार मानली नाही.  त्यांनी आपल्या अयांशचे प्राण वाचवण्यासाठी AyaanshFightsSMA नावाचं एक ट्विटर अकाउंट सुरू केलं. ऑनलाइन फंडरेझर (Online Fundraiser) मोहिमाही सुरू केल्या. दरम्यान, या सगळ्याचा खूप चांगला उपयोग झाला असून, त्या लहानग्यासाठी 16 कोटी रुपये उभे राहिले आहेत. ट्विटर अकाउंटवरच हे जाहीर करण्यात आलं. हे वाचा-सुई पाहून तरुणीचा कल्ला! 4-5 जणांनी ट्रीक वापरून दिली लस;भावाने VIRAL केला VIDEO 'अयांशचे प्राण वाचवण्यासाठी सुरू केलेला हा अवघड प्रवास इतक्या सुरळीतपणे पार पडेल, असं वाटलं नव्हतं. झोल्गेन्स्मा औषधासाठी 16 कोटी रुपये उभे झाले आहेत, हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आम्हाला साह्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला खूप खूप धन्यवाद. हा तुमचा विजय आहे. आपण सर्वांनी हे करून दाखवलं,' अशी भावनिक पोस्ट या ट्विटर अकाउंटवर अयांशचे आई-वडिल रूपल आणि योगेश गुप्ता यांनी शेअर केली आहे. या दाम्पत्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे विशेष आभार मानले आहेत. 'आम्ही चाहते म्हणून कायमच तुमच्यावर प्रेम केलं; पण अयांशसाठी आणि या मोहिमेसाठी तुम्ही जे काही केलं आहे, ते आमच्या अपेक्षेपलीकडचं आहे. खूप आभार. आयुष्याची ही लढाई षट्कार मारून जिंकण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केलीत. आम्ही कायमच तुमच्या ऋणात राहू,' अशा शब्दांत रूपल आणि योगेश गुप्ता यांनी विराट-अनुष्काचे आभार मानले आहेत. दरम्यान, राजकुमार राव, जावेद जाफरी, इम्रान हाश्मी, दिया मिर्झा, अर्जून कपूर, सारा अली खान, नकुल मेहता, ऋत्विक धनजानी हे सेलेब्रिटीही या मोहिमेत सहभागी झाले असल्याचं या ट्विटर अकाउंटवरच्या ट्विट्सवरून दिसतं आहे. या ट्विटर अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, अयांशला असलेला स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी (Spinal Muscular Atrophy) या दुर्मीळातला दुर्मीळ जनुकीय विकार आहे. तो 10 हजारांत एखाद्या मुलाला होतो. नर्व्ह सेल्सना क्रियाशील ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रोटीनची (Protein) निर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेलं एक जनुक (Gene) अयांशच्या शरीरात नाही. त्यामुळे त्याच्यावर जीन थेरपी इन्फ्युजन (Gene Therapy Infusion) करावं लागणार आहे. एकदाच कराव्या लागणाऱ्या या उपचारांचा खर्च 2.1 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 16 कोटी रुपये आहे. हा निधी आता उभा झाला असल्यामुळे अयांशचे प्राण वाचणार आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Anushka sharma, Virat, Virat anushka, Virat kohli, Virat kohli and anushka sharma

    पुढील बातम्या