मुंबई, 23 मे: कोरोना काळात व्हॅक्सिनेशन (Coronavirus Vaccination) प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या आजारातून वाचण्यासाठी एक आशेचा किरण दिसू लागला आहे. देशातील अनेक भागात लसीकरण मोहीम (Vaccination Drive in India) सुरळीतपणे सुरू आहे तर बहुतांश भागात लसीकरण होत नाही आहे. दरम्यान असं असलं तरीही जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हा ती घेण्याचं आवाहन नेतेमंडळी, सरकार आणि जागरुक नागरिकांकडून केलं जात आहे.
सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून अनेक कलाकार, सेलिब्रिटी यांनी स्वत: लस घेण्याचा व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय पंतप्रधान, राज्यातील महत्त्वाचे राजकारणी, नेतेमंडळी यांचे देखील लस घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरू झाल्यानंतर लस घेताना व्हिडीओ किंवा फोटो पोस्ट करणं हा एक ट्रेंडच होऊन बसला आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
हे वाचा-हर एक फ्रेंड...! लग्नात टॉयलेट क्लीनर अन् ब्रश कोण गिफ्ट करतं? वधूवर हताश; VIDEO
दरम्यान अलीकडे आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका तरुणीच्या भावाने तिचा लस घेतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या अंकित सोंठालिया या युजरने पोस्ट केलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ झारखंडमधील जारमुंडी परिसरातील आहे. यावेळी त्याच्या बहिणीने लस घेताना एखाद्या लहान मुलाप्रमाणे कल्ला केला आहे. नॅन्सी अग्रवाल या नावाने तिचं ट्विटर अकाउंट आहे. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने तिला टॅग देखील केलं आहे.
My sister @nancyag75083710 vaccinated today at jarmundi chc. Injection se dar v aur vaccine v lena hai Esi thinking ke sath sabhi ko vaccine lena chahiye. Thank u @DumkaDc for the arrangement..on duty corona warriors were too humble n cooperative.@HemantSorenJMM @BannaGupta76 pic.twitter.com/7h7ak5L63d
— ankit sonthalia (@sonthalia_ankit) May 21, 2021
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका तरुणीला इंजेक्शन देण्यासाठी चार-पाच जणांनी घेराव घातला आहे. तिला बोलण्यात गुंतवून तरुणीला लस देण्यात आली आहे. तिच्याबरोबर आलेले देखील तिला धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने असं म्हटलं आहे की, 'इंजेक्शनची भीती आहे पण व्हॅक्सिन देखील घ्यायचं आहे. असाच विचार करून सर्वांनी लस घ्यायला हवी.' या ट्वीटमध्ये त्याने कोरोना वॉरियर्सचे आभार देखील मानले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Sanjeevani