Home /News /national /

सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona; कुटुंबातले 4 जण पॉझिटिव्ह

सौरव गांगुलीच्या परिवारापर्यंत पोहोचला Corona; कुटुंबातले 4 जण पॉझिटिव्ह

BCCI अध्‍यक्ष सौरव गांगुलीच्या परिवारात कोरोनाचा विषाणू घुसला असल्याचं वृत्त आहे.

    दिल्‍ली, 20 जून : Coronavirus चा प्रादुर्भाव वाढत आहे. नेते, राजकारणी, अधिकारी यांच्यानंतर आता माजी क्रिकेटपटू आणि BCCI अध्‍यक्ष सौरव गांगुलीच्या परिवारात कोरोनाचा विषाणू घुसला असल्याचं वृत्त आहे. सौरव गांगुलीचा (Sourav Ganguly)मोठा भाऊ आणि त्याच्या घरातल्या 4 जणांना विषाणूचा संसर्ग झाला असल्याची माहिती आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सौरवचे मोठे बंधू स्नेहाशीष गांगुली कोविड 19 पॉजिटिव्ह सापडले. त्यांच्या पत्नीलासुद्धा विषाणूची लागण झाली आहे. एका वृत्तानुसार या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथून त्यांना कदाचित डिस्चार्ज मिळू शकतो. कोरोना व्हायरस दुसऱ्या आणि सर्वाधिक धोकादायक टप्प्यात, WHO नं दिला 'हा' इशारा स्नेहाशीष गांगुली यांचे सासू-सासरे गेल्या आठवड्यात Covid पॉझिटिव्ह झाले होते. त्यानंतर घरातल्या इतरांनाही लक्षणं जाणवू लागली होती. सौरव गांगुलीचा आपल्या भावाशी गेल्या आठवड्यापासून थेट संपर्क आली असण्याची शक्यता कमी आहे, कारण ते दुसऱ्या घरात राहात होते. पण तरीही BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांचे कुटुंबीयसुद्धा अधिक काळजी घेत आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. 'घरी बोलवून माझ्यावर रेप केला मग...', स्टार खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा
    First published:

    पुढील बातम्या