Home /News /sport /

'घरी बोलवून माझ्यावर रेप केला मग...', स्टार खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा

'घरी बोलवून माझ्यावर रेप केला मग...', स्टार खेळाडूनं केला धक्कादायक खुलासा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #speakingout ट्रेंड सुरू आहे.

    नवी दिल्ली, 20 जून : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #speakingout ट्रेंड सुरू आहे. या ट्रेंडच्या मदतीनं अशा महिला समोर आल्या आहेत, ज्यांनी WWE, NWA आणि इतर फायटिंग स्टारवर बलात्काराचे आरोप केले आहे. हे आरोप सोशल मीडियावर करण्यात आल्यानंतर अनेक रेसलिंग स्टार समोर आले आहे. बऱ्याच जणांनी हे आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आता सोशल मीडियावर या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे. WWE च्या प्रेसीडेंटवर लावला आरोप एक स्वतंत्र रेसलर लिझ सावजनं ( Liz Savage) WWE चे उपाध्यक्ष डेव्हिड लगाना (David Lagana) वर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. लिझ म्हणाली की, चार वर्षे मित्र राहिल्यानंतर डेव्हिडने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ती असेही म्हणाली की, "डेव्हिडने बोलवल्यानंतर मी लॉस एंजेलिसला आले. मी रेसलिंग प्रमोशन एजन्सीमध्ये काम करावे अशी त्याची इच्छा होती आणि तोपर्यंत मी त्याच्याबरोबर राहू शकेन, असेही तो म्हणाला. यानंतर त्याने माझ्या घरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला". दरम्यान हे प्रकरण पुढे आल्यानंतर डेव्हिडनं आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. WWE करणार या प्रकरणाची चौकशी डेव्हिड लगानाशिवाय (David Lagana), जॉर्डन डेव्हलिन, ट्रेविस बॅंक्स, जो कोफे, मॅट रिडल, जॅक गॅलाघर आणि टायलर बॅट यासारख्या स्टार खेळाडूंवरही आरोप करण्यात आले आहेत. अनेक महिला रेसलरही पुढे आल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या सर्व आरोपानंतर WWE नं या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले आहे.
    First published:

    Tags: Woman wrestler, WWE

    पुढील बातम्या