कोरोना व्हायरस दुसऱ्या आणि सर्वाधिक धोकादायक टप्प्यात, WHO नं दिला 'हा' इशारा

Photo-pixabay

निम्म्याहून अधिक प्रकरणे अमेरिकेची आहेत. या व्यतिरिक्त आशिया आणि मध्य पूर्व मधूनही बरेच रुग्ण आढळले आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 20 जून : कोरोना व्हायरसचं थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 87 लाखांहून अधिक आहे. भारतातही गेल्या आठवड्यात रुग्णांच्या आकडेवारीत वेगानं वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. भारतात 24 तासांत तब्बल 14 हजार 516 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंतची ही सर्वात जास्त आकडेवारी आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाखांच्या घरात गेला आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं पुन्हा एकदा धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाचा सगळ्या धोक्याच्या आणि दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो असल्याचं WHO ने म्हटलं आहे. दोन आठवडे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असा इशारा आधीच WHO ने दिला होता. कोरोना आता आणखीन 10 पट धोकादायक झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सर्वाधिक या टप्प्यात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे वाचा-नाशकात कोरोनाचा कहर! 4 दिवसांत 25 जणांचा मृत्यू, रुग्णांनी गाठला नवा उच्चांक जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी शुक्रवारी सांगितले की आपण दुसऱ्या आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचलो आहोत. गुरुवारी एका दिवसात दीड लाखाहून अधिक कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यातील निम्म्याहून अधिक प्रकरणे अमेरिकेची आहेत. या व्यतिरिक्त आशिया आणि मध्य पूर्व मधूनही बरेच रुग्ण आढळले आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 95 हजार 048 एकूण कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील 1 लाख 68 हजार 269 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 2 लाख 13 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 12 हजार 948 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताचा रिकव्हरी रेट भारताचा वाढता आहे. रिकव्हरी रेट आता 53.8% हून 54.1% झाला आहे. हे वाचा-पुण्यात कोरोना उपचाराबाबत मोठे बदल, महानगरपालिकेने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय हे वाचा-रिक्षाचालक कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णाच्या पत्नीची उपचारासाठी 8 दिवस वणवण संपादन- क्रांती कानेटकर
    First published: