Lockdown: अचानक बँक खात्यात जमा झाले लाखो रुपये, घाबरून लोकांनी गाठलं पोलीस स्टेशन

Lockdown: अचानक बँक खात्यात जमा झाले लाखो रुपये, घाबरून लोकांनी गाठलं पोलीस स्टेशन

तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये 2 ते 5 लाखांची रक्कम जमा होऊ लागली. सुरूवातीला याबद्दल कुणीच बोललं नाही. मात्र नंतर त्या गावांमध्ये कुजबूज सुरू झाली.

  • Share this:

नवी दिल्ली 11 मे: लॉकडाऊनमुळे सगळ्या देशात कारभार ठप्प आहे. व्यवहारच नसल्याने पैशांची देवघेवही ठप्प झालीय. त्यामुळे ग्रामीण भागात पैशांची चणचण आहे. असं असताना राजस्थानातल्या तीन गावांमध्ये लोकांच्या बँक खात्यांमध्ये 2 ते 5 लाखांची रक्कम जमा होऊ लागली. सुरूवातीला याबद्दल कुणीच बोललं नाही. मात्र 3 गावांमध्ये त्याबद्दल कुजबूज सुरू झाल्याने सगळ्या लोकांनी अखेर पोलीस स्टेशन गाठलं आणि हा सायबर क्राईमचा प्रकार असल्याचं पोलिसांनी त्यांना सांगितलं.

राजस्थान मधल्या(Rajasthan) भरतपुर जिल्ह्यातल्या चिकसाना इथली ही घटना आहे. चिकसाना आणि त्याच्या जवळच्या अन्य दोन गावांमध्ये लोकांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने सुरुवातीला त्यांना आनंद झाला. मात्र नंतर ते सगळेच घाबरून गेले. अचानक सगळ्यांना SMS येऊ लागल्याने लोकांना हा फसवणुकीचा प्रकार वाटला.

त्यानंतर त्या सगळ्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्यांना सगळी कहाणी सांगितली. त्यांच्या गावातल्या संदीप या युवकाने गाववाल्याकडून त्यांचे एटीएम कार्ड्स घेतल्याचं सांगितलं. त्याने त्याच्या मित्राने नौदलात नोकरी लागण्यासाठी 10 लाख रुपये कुणाला तरी दिले होते. मात्र नोकरी लागली नाही. आता त्याच्या बहिणीचं लग्न असल्याने त्याला ते पैसे परत घ्यायचे आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे कॅश घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याने अनेकांकडून एटीएम कार्ड्स घेतली.

बँक खात्यात तुमचे पैसे सुरक्षित आहेत का? SBIने 44 कोटी ग्राहकांना केलं सावधान

अशा पद्धतीने त्याने तीन गावांमधल्या तब्बल 54 लोकांकड़ून कार्ड घेत कुणालातरी गंडा घातला अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. संदीप सध्या फरार असून पोलीस तपास करत आहेत. सगळ्यांनी आपले बँकेचे डिटेल्स देताना सावध राहावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हे वाचा -

'लॉकडाऊनबाबत योग्य निर्णय घेतले म्हणून नाहीतर...', WHOनं केलं मोदी सरकारचं कौतुक

विशेष ट्रेनने घरी परतण्याच्या विचारात आहात?प्रवासादरम्यान काय कराल आणि काय नाही

VIDEO : लॉकडाऊनमध्ये पोलिसाची 'सिंघम' गिरी, ड्यूटी सोडून करत आहे खतरनाक स्टंट

 

 

 

First Published: May 11, 2020 03:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading