नवी दिल्ली 19 जुलै: कोरोनामुळे देशात तीन महिने लॉकडाऊनची (Lockdown) स्थिती होती. जवळपास 100 दिवस देशातले सगळे व्यवहार ठप्प आणि विस्कळीत होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. या बंदचा मोठा फटका देशातल्या सर्वच क्षेत्रांना बसला आहे. पण आर्थिक स्थिती भक्कम असल्याने मोठ्या उद्योगांना तो धक्का सहन करता आला. मात्र छोट्या उद्योगांना याचा जबर हादरा बसला आहे. या 100 दिवसांमध्ये छोट्या किराना दुकानदारांचं तब्बल 15.5 लाख कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज Confederation of All India Tradersने व्यक्त केला आहे.
सतत दोन काही दिवस दुकाने बंद असणं, लोकांनी फिरवलेली पाठ, मालाचा पुरवढा बंद होणं, आर्थिक गणित कोलमडणं यामुळे छोट्या दुकानदाराचं कंबरडं मोडलं आहे, अशी माहिती CATचे महासचिव प्रविण खंडेलवाल यांनी दिली आहे.
या दुकानदारांची उपजिविका ही दररोज होणाऱ्या व्यवहारावरच अवलंबून असते. मात्र व्यवसायच बंद असल्याने या दुकानदारांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यात मोठ्या प्रमाणावर लोकांनी भाड्याची दुकाने घेऊन व्यवसाय सुरू केला होता. आता व्यवसायच नसल्याने ते भाड्याचे पैसे भरायचे कसे असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे.
सरकारने या दुकानदारांसाठी काही उपाय योजना करावी नाही तर या हजारो दुकानदारांवर बेकार होण्याची वेळ येईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.
गाण्याच्या तालावर नाचणाऱ्या शेळ्यांचा कळप पाहिलात? हा VIDEO पाहून पोट धरून हसाल!
दरम्यान, देशातील कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांनी आज सर्व रेकॉर्ड मोडले. देशात पहिल्यांदाच 24 तासांत तब्बल 38 हजार 903 नवे रुग्ण सापडले. यासह आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 10 लाख 77 हजार 618 झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 543 रुग्णांचा मृत्यू झाला.
निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची स्वारी घोड्यावर, कोरोनामुळे फुटला घाम
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात 3 लाख 73 हजार 379 सक्रिय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 26 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर, 6 लाख 77 हजार 422 रुग्ण निरोगीही झाले आहेत. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या 10.86 टक्के आहे. तर, रिकव्हरी रेट हा 65.24% झाला आहे. देशातील सर्वात कोरोना प्रभावित राज्य आहे महाराष्ट्र (Maharashtra)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown