Home /News /national /

निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची स्वारी घोड्यावर, कोरोनामुळे उमेदवारांना फुटला घाम

निवडणुकीत प्रचारासाठी भाजप नेत्यांची स्वारी घोड्यावर, कोरोनामुळे उमेदवारांना फुटला घाम

कोरोनामुळे सध्या नागरीक बाहेर पडत नाहीत त्यामुळे मतदारांपर्यंत कसं जायचं आणि मतदानासाठी त्यांना बाहेर कसं काढायचं असा प्रश्न इथल्या उमेदवार आणि नेत्यांना पडला आहे.

    इंदूर 19 जुलै: देशभर कोरोनाचा उद्रेक सुरु असतांनाच मध्यप्रदेशात विधानसभेच्या एका पोटनिवडणुकीसाठी (MP by Election)  सध्या प्रचार सुरू आहे. इथल्या सांवेर विधानसभा मतदार संघामध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे. पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा आयोगाने केली नसली तरी भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. इथे भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत आहे. काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर काँग्रेसला भाजपचा पराभव करायचा आहे. कोरोनामुळे सध्या नागरीक बाहेर पडत नाहीत त्यामुळे मतदारांपर्यंत कसं जायचं आणि मतदानासाठी त्यांना बाहेर कसं काढायचं असा प्रश्न इथल्या उमेदवार आणि नेत्यांना पडला आहे. खजुरिया गावात आज भाजपने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यासाठी भाजपचे नेते आणि खासदार शंकर लालवानी चक्क घोड्यावर बसून आले. सगळे लोक उत्सुकतेनं खासदारांकडे बघत होते. सांवेर विधानसभा मतदारसंघात जलसंपदा मंत्री तुलसी सिलावट हे निवडणूक लढवत असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. भाजपची उमेदवार कुठल्याही परिस्थिती जिंकणारच असा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. तर काँग्रेस घोड्यावर बाशिंग बांधून निघणाऱ्या उमेदवाराचा पराभव करणारच असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. हे वाचाराम मंदिराच्या भूमिपूजनसाठी 5 ऑगस्ट निवडण्यामागे आहे खास कारण काही महिन्यांपूर्वीच भाजपने काँग्रेसच्या बुरुजाला खिंडार पाडत मध्यप्रदेशात सत्ता मिळवली होती. त्यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणू जिंकण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसली आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत बाजी मारून भाजपला धडा शिकवायचा आहे. निवडणुकीची तारिख घोषीत होण्याआधीच मतदारसंघात प्रचाराची एक फेरी पूर्ण करण्याचा दोनही पक्षांचा प्रयत्न आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या