नवी दिल्ली 19 जुलै: कोरोनामुळे लोक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या घरूनच काम काम करत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून तर सोशल मीडियांवर वेगवेगळ्या VIDEOचा पूरच आलाय. ग्रामीण भागांपासून ते मेट्रो शहरांपर्यंत अचानक दिसलेल्या काही क्षणांचा लोक व्हिडीओ बनवतात आणि नंतर तो VIRAL होतं. अशा व्हिडीओंना उत्तम पद्धतीने Edit करून ते सोशल मीडियावर टाकण्यात येतं. असा एक गाण्याच्या तालावर नाचणारा शेळ्यांच्या कळपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरुण फॉरेस्ट ऑफिसर (IFS Officer) असलेले प्रविण केसवान हे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. जंगलातले दुर्मिळ फोटो, प्राण्यांच्या करामती, अद्भूत निसर्ग याविषयी ते कायम फोटो आणि व्हिडीओ टाकत असतात. निसर्गाविषयी जागृतीही ते करत असतात. प्रविण केसवान यांनी असाच एक व्हिडीओ आपल्या ट्विटरवर टाकला आहे. हा व्हिडीओ आहे नाचणाऱ्या शेळ्यांचा. राजस्थानातल्या खेड्यातला हा व्हिडीओ असावा असा अंदाज आहे. गुराखी शेळ्यांचा कळप घेऊन जात आहे. त्याचवेळी एक उडत्या चालीचं गाणही वाजत आहे. त्या गाण्याच्या तालावर तो कळप माना डोलवत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल असंही केसवान यांनी म्हटलं आहे.
92 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा VIDEO पाहिला आहे. दीड हजारांपेक्षा जास्त लोकांनी तो Retweet केलाय तर 10 हजारांच्या जवळपास लोकांनी तो Like केला आहे.