मराठी बातम्या /बातम्या /देश /

भीषण! आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा!

भीषण! आधी औषधं, मग ऑक्सिजन आणि आता या शहरात लागल्या डेथ सर्टिफिकेटसाठी रांगा!

घाबरवण्यासाठी नाही पण परिस्थितीचा अंदाज देण्यासाठी ही बातमी! गुजरातमधल्या सुरतमधला हा फोटो पाहा कशासाठी आहे. शहाणे व्हा, घरात राहा, काळजी घ्या.

जनक दवे / सुरत, 27 एप्रिल: देशभरातच कोरोनाव्हारसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना बळींची संख्याही लक्षणीय वाढली आहे. गुजरात (Gujarat coronavirus data) च्या सुरत (Surat)मध्ये कोविड-19 ची साथ चिंताजनक परिस्थितीत पोहोचली आहे. त्यातच रेमडेसिविर इंजेक्‍शन (Remdesivir) आणि ऑक्‍सिजन (Oxygen)साठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं आता त्याहून कहर म्हणजे डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लागल्या आहेत.

सुरतमध्ये सरकारी कार्यालयांच्या बाहेर मृत्यूचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांह लागल्याचं चित्र होतं. सरकारी कार्यालयांमध्ये पुरेशी उपस्थिती कोरोनामुळे नाही, ही गोष्ट जरी असली तरी या शहरात गेल्या महिन्यात आणि या महिन्यात झालेल्या मृत्यूंचे आकडे भयावह आहेत. कोरोना मृत्यूनंतर स्मशानात अंत्यसंस्कारांसाठीसुद्धा रांगा लावाव्या लागत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनाही देशाच्या मदतीला सरसावली, सद्यस्थितीबाबत व्यक्त केली चिंता

देल्या महिन्याभरात सुरतमध्ये 500 लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावलं. हा अधिकृत आकडा आहे. पण स्मशानात अंत्यसंस्कारांसाठी आलेल्या मृतदेहांचा विचार करता खरा आकडा आणखी मोटा असण्याची शक्यता आहे. कुटुंबात कुणाचाही मृत्यू झाल्यानंतर सरकारी कामांसाठी डेथ सर्टिफिकेट हे महत्त्वाचं काददपत्र मानलं जातं. त्यामुळेच ते मिळवण्यासाठी लोक आता सरकारी कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. विचार केला तर अंगावर सरसरून काटा येईल, असा हा फोटो आहे.

कोरोना लढाईत महाराष्ट्र आघाडीवर! आता 'या' राज्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असल्यामुळेच घरीच राहून काळजी घ्यायला हवी. थोडी लक्षणं दिसली तरी चाचणी करून घ्यायला हवी. यासाठीच ही बातमी.

First published:

Tags: Coronavirus, Surat