मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Maharashtra Fights Back : कोरोना लढाईत महाराष्ट्र आघाडीवर! आता 'या' राज्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

Maharashtra Fights Back : कोरोना लढाईत महाराष्ट्र आघाडीवर! आता 'या' राज्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन

राज्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (Maharashtra corona positivity rate) कमी झाला आहे आणि लसीकरणाचा वेग (Corona vaccination) वाढला आहे.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (Maharashtra corona positivity rate) कमी झाला आहे आणि लसीकरणाचा वेग (Corona vaccination) वाढला आहे.

राज्यातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट (Maharashtra corona positivity rate) कमी झाला आहे आणि लसीकरणाचा वेग (Corona vaccination) वाढला आहे.

नवी दिल्ली, 27 एप्रिल : देशात महाराष्ट्रात कोरोनाची (Maharashtra coronavirus update) परिस्थिती खूपच गंभीर असल्याचं चित्र होतं. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात (Corona cases in Maharashtra) होती. एकट्या महाराष्ट्रानेच मोदी सरकारची चिंता वाढवली होती. पण आता मात्र कोरोनाविरोधी लढाईत महाराष्ट्रच आघाडीवर आहे. राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट (Maharashtra corona positivity rate) कमी झाला आहे आणि लसीकरणाचा वेग वाढला आहे. आता महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यांनी मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे.

महाराष्ट्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. एकूण कोरोना चाचण्यांपैकी किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळले हे सांगणारा आकडा म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट. देशात कोरोनाचा सर्वाधिक पॉझिटिव्ही रेट हा राजस्थानमध्ये आहे. तर सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट हा महाराष्ट्रात आहे.

कोरोना पॉझिटिव्ही रेट

राजस्थान - 37.11%

दिल्ली - 35.02%

गोवा - 4.27%

पश्चिम बंगाल - 32.93%

हरयाणा - 32.38%

छत्तीसगड - 27.80%

महाराष्ट्र - 21.89%

हे वाचा - कोरोनाविरोधी लढ्यात महाराष्ट्र अग्रेसर; सोमवारी एका दिवसात विक्रमी लसीकरण

ही आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील परिस्थिती तशी खूपच दिलासादायक आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या घटल्यामुळे देशातील नव्या रुग्णसंख्येतही घट आली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखाहून अधिक झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 65,000 च्या पुढे गेली आहे.

यामुळे सोमवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या (Corona Cases in India) संख्येत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी 3 लाख 20 हजार 435 कोरोना रुग्णांची नोंद (Corona Update) झाली आहे. तर, 2764 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची मृत्यूचा एकूण आकडा 1 लाख 97 हजार 880 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या कोरोनाचे 28 लाख 82 हजार 513 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

लसीकरणातही महाराष्ट्र अग्रेसर

लसीकरणाबाबतही (Corona Vaccination) महाराष्ट्रातून सकारात्मक बातमी आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात रेकॉर्ड 5 लाख लशीचे डोस दिले गेले आहेत. महाराष्ट्र लवकरच एकूण 1.5 कोटी लसी (Vaccine) देणारं पहिलं राज्य ठरू शकतं.

हे वाचा - Covid-19 Vaccine: राज्य सरकारचं सीरमला पत्र, केली 'ही' मागणी

देशभरात कोरोना लशीचे 14.5 कोटीहून अधिक डोस आतापर्यंत दिले गेले आहेत. यातील 31 लाखाहून अधिक डोस सोमवारी दिले गेले आहेत. आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी रात्री आठ वाजेपर्यंतच्या रिपोर्टनुसार, देशभरात लसीचे 14,50,85,911 डोस दिले गेले आहेत. यातील 31,74,688 डोस सोमवारी लसीकरणाच्या 101 व्या दिवशी दिले गेले आहेत. मंत्रालयानं सांगितलं, की सोमवारी 19,73,778 जणांना पहिला आणि 12,00,910 जणांना लसीचा दुसरा डोस दिला गेला.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus cases