मराठी बातम्या /बातम्या /देश /COVID-19, Delta च्या भयंकर परिस्थितीवर पाश्चिमात्य माध्यमांनी भारताला धरलं धारेवर; पण अमेरिकेचं काय?

COVID-19, Delta च्या भयंकर परिस्थितीवर पाश्चिमात्य माध्यमांनी भारताला धरलं धारेवर; पण अमेरिकेचं काय?

भारतात Covid-19 च्या परिस्थिती कशी भीषण आहे, चिता जळत आहेत वगैरे प्रचंड नकारात्मक बातम्या पाश्चिमात्य माध्यमं सातत्याने देत आहेत, पण अमेरिकेच्या कोरोना परिस्थितीबद्दल मौन का?

  नवी दिल्ली,  25 ऑगस्ट : आपण हसे दुसऱ्याला आणि शेंबूड आपल्या नाकाला, अशी म्हण आपल्याकडे आहे.  अशीच परिस्थिती सध्या कोरोनाच्या बाबतीतही दिसून येते आहे. भारतात कोरोनाची (Coronavirus) परिस्थिती किती भयंकर आहे, भविष्यात किती मोठा धोका आहे (Delta variant), सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात कसं अपयशी ठरतं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पाश्चिमात्य माध्यमं (Western media) करत आहेत. पण पाश्चिमात्य देशांमध्येच विशेषतः अमेरिकेत कोरोनाची परिस्थिती भयंकर इथल्या परिस्थितीबाबत मात्र या माध्यमांनी मौन बाळगलं आहे.

  भारतात कोरोना परिस्थिती किती गंभीर आहे हे दाखवणाऱ्या जळत्या चिता, रुग्णालयांतली गर्दी, ऑक्सिजनचा तुटवडा याबाबत इत्यंभूत वर्णनांच्या बातम्या पाश्चिमात्य माध्यमांनी दिल्या होत्या. पण त्याच वेळी पहिल्या लाटेत अमेरिकेत याहून परिस्थिती भीषण होती. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटने सध्यासुद्धा अमेरिकेत थैमान घातलं आहे, याबाबत मात्र हीच माध्यमं मौन बाळगताना दिसतात.

  यूएसमध्ये डेल्टाची लाट आली आहे. या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात तारेवरची कसरत करावी लागते आहे. डेल्टा व्हेरिएंटने देशावर संकट आणलं आहे. गेल्या दोन आठवड्यात अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंट जीवघेणा ठरत आहे. 42 ते 50 राज्यांत नवीन प्रकरणं वाढत आहे. तर 43 देशांमध्ये सर्वात जास्त मृत्यू होत आहे.  फक्त संसर्गावर नियंत्रण मिळवण्यातच नव्हे तर लसीकरणातही देशाला अनेक अडचणी येत असल्याचं इथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

  हे वाचा - Covishield : कोरोना लशीच्या 2 डोसमधील अंतर कमी होणार; लसीकरणातही मोठा बदल

  अगदी यूएसमधील आरोग्य तज्ज्ञ अँथनी फाऊसी ज्यांनी 2022 पर्यंत देश कोरोनावर चांगल्यापैकी नियंत्रण मिळवेल, असा दावा केला होता. त्यांनीसुद्धा आता आपलं वक्तव्य बदललं आहे. ओपी इंडियाच्या रिपोर्टनुसार NPR शी बोलताना त्यांनी सांगितलं की, जर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झालं तर 2022 सालापर्यंत आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो.

  कोरोना विषाणूचा संसर्ग 2019मध्ये सुरू झाला आणि त्याने जगभर हाहाकार माजवला. गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ कोविड-19ने (Covid19) निर्माण केलेली ही गंभीर परिस्थिती कायम आहे. त्यावर आता लसीकरणाचा उपाय शोधण्यात आला आहे. तरीही अद्याप बऱ्याच मोठ्या लोकसंख्येचं लसीकरण होणं बाकी आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स सातत्याने तयार होत आहेत. त्यापैकी डेल्टा व्हॅरिएंट खूप घातक असल्याचं दिसून आलं आहे. आता वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची गरज शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

  हे वाचा -  चिंताजनक! एकाच दिवसात 27 पेशंट, राज्यातील Delta plus रुग्णांचा आकडा शंभरी पार

  कारण पुढच्या वर्षीपर्यंत कोविड-22 (Covid22) हा अधिक जास्त वेगाने पसरणारा कोरोनाचा सुपर व्हॅरिएंट (Super Variant of Corona) येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. लसीकरण न झालेल्या कोणाही व्यक्तीच्या मार्फत या सुपर व्हॅरिएंटचा फैलाव होऊ शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

  First published:
  top videos

   Tags: America, Corona virus in india, Coronavirus, Delta virus