Home /News /maharashtra /

चिंताजनक! एकाच दिवसात 27 पेशंट, राज्यातील Delta plus रुग्णांचा आकडा शंभरी पार

चिंताजनक! एकाच दिवसात 27 पेशंट, राज्यातील Delta plus रुग्णांचा आकडा शंभरी पार

Maharashtra delta plus : राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे.

    मुंबई, 23 ऑगस्ट : राज्यात (Maharashtra corona cases) कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave) नियंत्रणात आली. मात्र राज्यात डेल्टा व्हेरिएंटनं (Delta Variant) थैमान घालतो आहे. विशेषत: डेल्टा प्लस (Delta plus) रुग्णांची (Maharashtra delta plus cases) संख्या आता वाढू लागली आहे. आज दिवसभरात डेल्ट प्लसचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांचा आकडा शंभरी पार गेला आहे. राज्यात आता डेल्टा प्लस रुग्णांची एकूण संख्या 103 झाली आहे. दिवसभरात डेल्टा प्लसचे 27 रुग्ण वाढले आहेत.  त्यामुळे आता डेल्टा प्लसने राज्य सरकारची चिंता वाढवली आहे. आज सर्वाधिक रुग्ण अमरावती आणि गडचिरोतील सापडले आहेत. दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? अमरावती - 6 गडचिरोली - 6 नागपूर - 5 नगर - 4 यवतमाळ - 3 नाशिक - 2 भंडारा - 1 हे वाचा - निती आयोगाच्या इशाऱ्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती डेल्टा प्लस म्हणजे AY.1 हा डेल्टा व्हेरिएंटचं (Delta variant)  म्युटेशन आहे. जो अधिक संसर्गजन्य आहे. जूनमध्ये हा व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (variant of concern) असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली होती. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण एप्रिलमध्ये सापडला होता. जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर जुलैमध्ये डेल्टा व्हेरिएंटची (Delta Variant) रुग्ण संख्या शून्यावर आली होती. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही, अशी दिलासादायक माहिती दिली होती. पण आता ऑगस्टमध्ये डेल्टा प्लसने पुन्हा डोकं वर काढलं आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. हे वाचा - Mumbai: काळजी वाढवणारा निकाल! genome sequencing मध्ये सापडले डेल्टाचे 128 रुग्ण कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याचे आकडे सांगत असले तरी साथ संपलेली नाही. कोविड प्रतिबंधात्मक निर्देशांचं नागरिकांनी कठोर पालन करावं, असं आवाहन सरकारने केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Delta virus

    पुढील बातम्या