नवी दिल्ली, 02 एप्रिल : देसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. देशभरात आतापर्यंत 1900 च्या वर रुग्णांची संख्या पोहोचली आहे. पंजाबमध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. या व्यक्तीने सुवर्ण मंदिरात हजुरी रागी( किर्तनकार) काम केलं होतं. पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, सुवर्ण मंदिरात माजी हजुरी रागी आणि पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या या 62 वर्षीय व्यक्तीवर गेल्या काही दिवसांपासून अमृतसरमधील जीसीएमएच रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना अस्थमाचा त्रास होता. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. त्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला.
62-year-old Padma Shri awardee and former 'Hazuri Raagi' at Golden Temple dies of coronavirus in Amritsar: health official
— Press Trust of India (@PTI_News) April 2, 2020
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. पंजाबच्या आरोग्य विभागानं याबबद्दल ही माहिती दिली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. देशभरात न आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू दरम्यान, देशभरात बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा - कोरोनाचा सर्वात भीतीदायक VIDEO, तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर तुफान दगडफेक कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 36 नव्या केसेस आढळल्यानं 338 वर संख्या पोहोचली आहे. हेही वाचा - तब्लिगी जमातमुळे तब्बल 9000 लोकांना कोरोनाचा धोका, केंद्राने जाहीर केली आकडेवारी त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.