इंदूर, 02 मार्च : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये जवळपास 12 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा मध्य प्रदेशातील आकडा 75 वर पोहोचला आहे. या पैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. 6 नवीन परिसरातील हे रुग्ण आढळल्यानं आता चिंता व्यक्त होत आहे. त्याच सोबत आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी तपासणीसाठी आलेल्या वैद्यकीय पथकावर तुफान दगडफेक केली. हे पथक बुधवारी दुपारी तपासणीसाठी तत्काळ बखल इथे दाखल झाली. याचा निषेध करत रहिवाशांनी पोलिसांचे बॅरिकेट तोडून टीमवर दगडफेक केली. यानंतर प्रकरण शांत करण्यासाठी पोलिस घटनास्थळी पोहोचले. वैद्यकीय पथक आणि स्थानिकांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. लोकांनी निषेध करत या पथकावर तुफान हल्ला केला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रुग्णाची संख्या वाढत असतानादेखील आपल्या चुकांमधून धडे घेणं मात्र इंदूरमधील नागरिकांना अद्याप उमगलंच नाही. 2 दिवसांपूर्वी राणीपुरा भागात वैद्यकीय पथकावर उर्मटपणे वागत त्यांच्या अंगावर थुंकल्याचा प्रकारही समोर आला होता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता लोकांनी कशा पद्धतीनं हल्ला केला आहे.
हे वाचा-10 दिवस श्वासाशी संघर्ष; तरुणाने जिंकला कोरोनाविरोधात लढा, म्हणाला...
#WATCH Madhya Pradesh: Locals of Tatpatti Bakhal in Indore pelt stones at health workers who were there to screen people, in wake of #Coronavirus outbreak. A case has been registered. (Note-Abusive language) (1.04.2020) pic.twitter.com/vkfOwYrfxK
— ANI (@ANI) April 1, 2020
कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णाची तपासणी कऱण्यासाठी हे पथक इंदूरमधील टाटापट्टी बाखल परिसरात पोहोचले. त्याचवेळी तिथल्या नागरिकांनी हुज्जत घालत त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. लाठ्या-काठ्या आणि पाईप घेऊन तिथल्या नागरिकांनी वैद्यकीय पथकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात 2 डॉक्टर जखमी झाले आहेत. इंदूर आणि छतरीपुरा या परिसरात दगडफेक आणि मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
हे वाचा-'दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको, याची खबरदारी घ्या'