मराठी बातम्या /बातम्या /देश /

VIDEO: या मुर्खांना आवरा! लॉकडाऊनमध्ये गच्चीवर भजी करायला गेले, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

VIDEO: या मुर्खांना आवरा! लॉकडाऊनमध्ये गच्चीवर भजी करायला गेले, पोलिसांचा ड्रोन आला आणि...

भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र अजूनही लोकं ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आहेत.

भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र अजूनही लोकं ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आहेत.

भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र अजूनही लोकं ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde
सुरत, 05 एप्रिल : कोरोनाचा प्रसार भारतात मोठ्या वेगाने होत आहे. भारतात 3 हजार 374 लोकांचा कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 77 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं भारतात सध्या लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळं 14 एप्रिलपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र अजूनही लोकं ही गोष्ट गांभीर्याने घेत नाही आहेत. असाच एक सुरतमधला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुरतमधील सरथाणा चेकपोस्ट जवळील एका इमारतीत लोकं गच्चीवर भजी तळताना दिसत आहेत. एकीकडे लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली असताना, लोकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना पसरत आहे. त्यामुळं शहरभर पोलिसांनी ड्रोनने लोकांवर नजर ठेवत आहे. याचवेळी सुरत पोलिसांच्या ड्रोनमध्ये हे चित्र कैद झाले. दरम्यान गच्चीवर भजी तळणाऱ्या लोकांनी पोलिसांचा ड्रोन पाहताच तेथून पळ काढला. वाचा-कुठे दारू मिळतेय का पाहण्यासाठी रात्रीचा निघाला बाहेर, नंतर...  वाचा-अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', पाकने केले Air Indiaचे कौतुक वाचा-काळजात घर करेल असा PHOTO VIRAL, वाचा यामागची अंगावर शहारे आणणारी कहाणी वाचा-फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई लॉकडाऊनमध्ये नियम कठोर असतानाही लोक मात्र मनमानी करताना दिसत आहेत. त्यामुळं कलम 144च्या उल्लंघन करणाऱ्यांवर सध्या कारवाई केली जात आहे. दरम्यान 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र अद्याप याबबात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या