मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कुठे दारू मिळतेय का पाहण्यासाठी रात्रीचा निघाला बाहेर, नंतर...

कुठे दारू मिळतेय का पाहण्यासाठी रात्रीचा निघाला बाहेर, नंतर...

रात्रीच्या सुमारास विकास दारू शोधण्यासाठी निघाला पण त्याला कुठेही दारू मिळाली नाही.

रात्रीच्या सुमारास विकास दारू शोधण्यासाठी निघाला पण त्याला कुठेही दारू मिळाली नाही.

रात्रीच्या सुमारास विकास दारू शोधण्यासाठी निघाला पण त्याला कुठेही दारू मिळाली नाही.

  • Published by:  Manoj Khandekar
नागपूर, 05 एप्रिल : कोरोनाव्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. या विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाले आहे. अशात सगळ्यात मोठी पंचायत झाली आहे ती दारूड्यांची. पण दारू न मिळाल्यामुळे नागपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकास विठ्ठल बर्वे (30 पांढराबोडी जयनगर) नावाच्या तरुणाने दारू न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रात्रीच्या सुमारास विकास दारू शोधण्यासाठी निघाला पण त्याला कुठेही दारू मिळाली नाही. त्यामुळे तणावात त्याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण परसिरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे वाचा - पुणेकरांसाठी धोक्याचा इशारा, कोरोना तिसऱ्या स्टेजच्या उंबरठ्यावर! मिळालेल्या माहितीनुसार, विकास हा मुळचा औरंगाबादचा आहे. पण कामानिमित्त तो नागपूरला सासू-सासऱ्यांसोबत राहतो. विकासला दारूचं व्यसन आहे. पण लॉकडाऊन असल्यामुळे सगळी दारूची दुकानं बंद आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दारू न मिळाल्यामुळे विकास तणावात होता. त्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू पिण्यासाठी न मिळाल्यामुळे विकास खूप तणावात होता. तो रोज दारूच्या शोधात बाहेर जायचा. 29 मार्चला मध्यरात्री विकास दारू शोधण्यासाठी गेला पण त्याला कुठेच मिळाली नाही. याच तणावामुळे त्याने घराच्या दारात अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. हे वाचा - कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली नरेंद्र मोदींकडे मदत यानंतर घरातील सगळे बाहेर आले आणि तात्काळ विकासला नजिकच्या रुग्णालयात दाखल केलं. पण त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. दरम्यान, विकासच्या मृत्यूचं खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पण तो दारूमुळे तणावात होता अशी माहिती कुटुंबियांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी सध्या आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. हे वाचा - भारतात जर या वयोगटात कोरोना पसरला तर आहे सगळ्यात जास्त धोका!
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या