मराठी बातम्या /बातम्या /देश /

अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', या कारणामुळे पाकने केले Air Indiaचे कौतुक

अस्सलाम अलैकुम! 'आम्हाला तुमचा अभिमान', या कारणामुळे पाकने केले Air Indiaचे कौतुक

एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात असताना पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कडून एक अनपेक्षित प्रशंसा मिळाली.

एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात असताना पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कडून एक अनपेक्षित प्रशंसा मिळाली.

एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात असताना पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) कडून एक अनपेक्षित प्रशंसा मिळाली.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 05 एप्रिल : एअर इंडियाला अलीकडेच पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून (एटीसी) एक अनपेक्षितरित्या कौतुकाची थाप मिळाली. एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात होते. सर्व खंडांमध्ये कोरोना पसरल्यामुळे हे विमान भारतात अडकलेल्या युरोपातील नागरिकांना मायदेशी घेऊन जात होते, यावेळी पाकने भारताचे स्वागत करत कौतुक केले.

जगातील सर्व देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे सर्व विदेशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशातच एअर इंडिया देशात अडकलेल्या नागरिकांची मदत करत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या एअर ट्राफिकच्या वतीने एअर इंडियाचे कौतुक करण्यात आले.

वाचा-फळांवर थुंकी लावून विकणाऱ्याचा VIDEO व्हायरल, पोलिसांनी केली कडक कारवाई

'असलम अलैकुम' म्हणत केले स्वागत

फ्रँकफर्टला जाणाऱ्या विशेष विमानाच्या एका कॅप्टनने, "हा माझ्या आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाच क्षण होता. जेव्हा पाकिस्तानी एटीसीने युरोपमधील आमच्या विशेष विमान संचालनाचे कौतुक", असे सांगितले. वरिष्ठ पाकिस्तानच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रीझनमध्ये (एफआयआर) प्रवेश करताच पाकिस्तानी एटीसीने एअर इंडियाचे 'असलम अलैकुम'ने स्वागत केले.

वाचा-हत्या की आत्महत्या? दिव्या भारती यांच्या मृत्यूचं न उलगडलेलं कोडं

'आम्हाला तुमचा अभिमान आहे'

भारतीय कॅप्टनने झालेल्या संभाषणाबाबत माहिती दिली. पाकिस्तान एटीसीने भारतीय वैमानिकांना,"तुम्ही फ्रँकफर्टला मदतकार्यासाठी जात आहात याची माहिती द्या", असे सांगितले. यावर एअर इंडियाच्या कॅप्टनने पाकिस्तानी हवाई क्षेत्राला 'हो, आम्ही फ्रँकफर्टला जात आहोत', असे सांगितले. यावर पाकिस्तानी एटीसीने एअर इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, 'आम्हाला अभिमान आहे की अशा जागतिक साथीच्या वेळी तुम्ही उड्डाणे करत आहात. शुभेच्छा. त्यानंतर भारताच्या नॅशनल एव्हिएशन सर्व्हिसच्या कॅप्टनने उत्तर दिले, "खूप खूप धन्यवाद". दरम्यान यानंतर, जेव्हा भारतीय विमाने इराणच्या हवाई क्षेत्रासाठी संकेत मिळत नाहीत, तेव्हा कर्णधार पुन्हा पाकिस्तानी हवाई क्षेत्राची संवाद साधला.

वाचा-गर्भवती महिला मुस्लिम म्हणून डॉक्टरांनी केले नाहीत उपचार, नवजात बालकाचा मृत्यू

First published:

Tags: Air india, Corona